Yuvraj Singh Trolled CSK Suresh Raina Answered  esakal
IPL

VIDEO : सीएसकेला ट्रोल करणाऱ्या युवराजला रैनाने दिले भन्नाट उत्तर

अनिरुद्ध संकपाळ

चेन्नई सुपर किंग्ज यंदाच्या आयपीएल हंगामात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे कर्णधार बदलून देखील त्यांची पराभवाची मालिका सुरूच आहे. मुंबई विरूद्धच्या सामन्यात तर चेन्नई फक्त 97 धावात ऑल आऊट झाली. ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची आयपीएलमधील सर्वात कमी धावसंध्या होती. विशेष म्हणजे चेन्नईची सर्वात कमी धावसंख्या (79) देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स विरूद्धच झाली होती.

या सामन्यात चेन्नईकडून फक्त कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेच झुंजार खेळी करत नाबाद 36 धावा केल्या. त्यानंतर मुंबईने 5 विकेट गमावून 97 धावांचे आव्हान पार केले. दरम्यान, चेन्नईच्या या खराब कामगिरीवरून सोशल मीडिायवर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात होते. या ट्रोलिंगमध्ये भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग देखील आघाडीवर होता. त्याने शेजारी बसलेल्या सीएसकेचा जुना खेळाडू सुरेश रैनाची देखील खेचली.

सुरेश रैना आणि युवराज सिंग हे दोघे चेन्नई 97 धावांवर ऑल आऊट झाली त्यावेळी एकत्रच होते. रैना युवराजच्या शेजारीच बसला होता. त्यावेळी युवराजने सेल्फी व्हिडिओ घेत सुरेश रैनाला 'रैना तुमचा संघ 97 धावांवर ऑल आऊट झाला. तुम्हाला याबबात काही म्हणायचं आहे काय?' असा प्रश्न विचारला. त्यावर रैनाने 'मी त्या सामन्यात नव्हतो.' असे उत्तर दिले.

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात 12 सामन्यात फक्त 8 गुण मिळवले आहेत. ते सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. आता चेन्नईसमोर उरलेल्या दोन सामन्यात विजय मिळवून आयपीएल 2022 हंगामाची सांगता चांगली करण्याचे आव्हान असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipake Case : "अभिजीत दिपकेला तात्काळ अटक करा..." सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची दिल्ली पोलिसांत तक्रार; नेमकं काय घडलं?

Ujani Dam: उजनी धरण ९८ टक्के भरले; पंढरपूर, माळशिरस आणि मंगळवेढ्यात वाढली पुराची धास्ती

Supreme Court Judge: 'लाईक्स'साठी बाजारात न्यायाचा लिलाव! सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सोशल मीडियावर का संतापले?

Marathi Live Updates News: खडकवासला धरणासमोरील पुलावरून व्यक्तीची उडी, शोधमोहीम सुरू

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरातील चोरीवरून राजकीय युद्ध पेटले! संशयित आरोपी ठाकरे गटाचा, सदा सरवणकरांचा आरोप

SCROLL FOR NEXT