Yuzvendra Chahal | IPL 2024 Sakal
IPL

Yuzvendra Chahal IPL: मुंबईविरुद्धच्या सामन्यात चहलने रचला इतिहास; 'हा' भीम पराक्रम करणारा बनला पहिलाच गोलंदाज

Yuzvendra Chahal Record: मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना युजवेंद्र चहलने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये कोणालाच न जमलेला विक्रम त्याने केला आहे.

Pranali Kodre

Yuzvendra Chahal Record: आयपीएल 2024 चा 38 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलने ऐतिहासिक कामगिरी केली.

या सामन्यात मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. पण मुंबईची सुरुवात खराब झाली. त्यांनी पॉवर-प्लेच्या 6 षटकातच 3 विकेट्स गमावल्या. त्यानंतरही युजवेंद्र चहलने मुंबईला चौथा धक्का दिला.

चहलने 8 व्या षटकात मोहम्मद नबीला आपल्याच चेंडूवर झेल घेत बाद केले. ही त्याची आयपीएलमधील 200 वी विकेट ठरली.

त्यामुळे तो आयपीएलमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणत्याच गोलंदाजाला आयपीएलमध्ये अशी कामगिरी करता आली नव्हती.

युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये 153 व्या सामन्यात खेळताना 152 व्या डावात 200वी विकेट घेतली. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहल पाठोपाठ ड्वेन ब्रावो आहे. त्याने 183 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (22 एप्रिल 2024 पर्यंत)

  • 200* विकेट्स - युजवेंद्र चहल (153 सामने)

  • 183 विकेट्स - ड्वेन ब्रावो (161 सामने)

  • 181 विकेट्स - पीयुष चावला (186 सामने)

  • 174 विकेट्स - भुवनेश्वर कुमार (167 सामने)

  • 173 विकेट्स - अमित मिश्रा (161 सामने)

मुंबईला सुरुवातीलाच मिळाले मोठे धक्के

दरम्यान या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांना पहिलाच धक्का ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला पहिल्याच षटकात 6 धावांवर बाद करत दिला. त्यानंतर संदीप शर्माने ईशान किशन (0) आणि सूर्यकुमार यादव (10) यांनी स्वस्तात बाद केले होते.

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, डेवाल्ड ब्रेविस

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - जोस बटलर, केशव महाराज, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT