yuzvendra chahal proposed jos buttler wife dhanashree chahal got trolled after photo went viral rajasthan royals ipl 2023 
IPL

Dhanashree Chahal News : रोमँटिक होत चहलने बटलरचा हात पकडताच धनश्री आली ट्रेंडिगला

रोहित कणसे

सध्या देशात आयपीएल (IPL 2023) ची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या लीगमध्ये भारतासोबतच इतर देशांचे क्रिकेटपटूही सहभागी झाले आहेत. आयपीएल २०२३ मध्ये रोज एकापेक्षा एक रोमांचक सामने या लीगमध्ये पाहायला मिळत आहेत. आजही आयपीएलमध्ये २ रोमांचक सामने खेळले जाणार आहेत.

दरम्यान, आयपीएलमधील पॉइंट टेबलमध्ये नंबर १ वर असलेल्या संजू सॅमसनचा संघ राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचे २ दिग्गज खेळाडू जोस बटलर आणि युझवेंद्र चहल दिसत आहेत. या फोटोमुळे युजवेंद्र चहलला आणि त्याची पत्नी धनश्रीला सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप ट्रोल केले जात आहे.

जॉस बटलर आणि युझवेंद्र चहल फोटोमध्ये एकत्र आहेत. या फोटोमध्ये बटलर आपल्या मुलीला कडेवर घेऊन उभा आहे, तर चहल हा गुडघे टेकून त्याला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करताना दिसत आहे. चहलच्या एका हातात फूल आहे, दुसऱ्या हाताने त्याने बटलरचा हात पकडला आहे. त्याच्या या कृतीमुळे युजवेंद्र चहलला त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. या फोटोच्या अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. लोक धनश्री चहला देखील याफोटोवरून ट्रोल करताना मजेशीर मीम्स पोस्ट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT