Yuzvendra Chahal Mim  sakal
IPL

IPL 2022: हॅटट्रिकनंतर चहलचं अनोखं सेलिब्रेशन; मिमला दिलं उत्तर

राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने केकेआरविरुद्ध हॅट्ट्रिक विकेट घेत नवा विक्रम आपल्या नावे केला

Kiran Mahanavar

IPL 2022: राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने केकेआरविरुद्ध हॅट्ट्रिक विकेट घेत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. हॅट्ट्रिक पूर्ण केल्यानंतर चहलने एका खास पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे. जे आता सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहे. चहलला त्या सेलिब्रेशन बदल विचारल्यावर त्याने हसत उत्तर दिले. वर्ल्ड कप 2019 दरम्यान युझवेंद्र चहलचा एक मीम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. यामध्ये चहल सीमारेषेच्या बाहेर आरामात पडलेला दिसत होता. हे मीम खूप लोकप्रिय झाले आणि चाहत्यांनी बर्‍याच ठिकाणी त्याचा वापर केला.(Yuzvendra Chahal IPL 2022)

युझवेंद्र चहलने जेव्हा त्याची हॅटट्रिक विकेट पूर्ण केली तेव्हा मैदानात ज्या पद्धतीने बसून तो आनंद साजरा केला. सामन्यानंतरच्या या अनोख्या सेलिब्रेशनबाबत तो म्हणाला की मी 2019 मध्ये व्हायरल झालेल्या मीमप्रमाणे साजरा केला आहे.

युजवेंद्र चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला होता. त्याने एका षटकाच्या जोरावर संपूर्ण सामन्याचे फासे उलटवले. त्याने 17 व्या षटकात KKR कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केले. अय्यरने 85 धावाची शानदार फलंदाजी केली. यानंतर त्याने पुढच्या दोन चेंडूंवर शिवम मावी आणि पॅट कमिन्सला धावा देत हॅटट्रिक पूर्ण केली. युझवेंद्र चहलने एकूण पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकात केकेआरचा जबरदस्त पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT