T20 World Cup 2024 sakal
क्रीडा

World Cup : अचानक दोन संघ झाले वर्ल्ड कपसाठी पात्र! मिळाली थेट एंट्री

एकदिवसीय वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. दरम्यान, दोन्ही संघांबाबत एक मोठे अपडेट...!

Kiran Mahanavar

Ireland and Scotland qualify for 2024 Men's T20 World Cup : एकदिवसीय वर्ल्ड कप यंदा भारतात खेळवला जाणार आहे. आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी दोन संघ थेट पात्र ठरले आहेत. 2024 चा टी-20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि यूएसमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीत पात्रता प्रक्रिया आधीच केली जात आहे. युरोप पात्रता स्पर्धेतून दोन युरोपीय देशांनी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये प्रवेश केला आहे.

स्कॉटलंड आणि आयर्लंडने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी यशस्वीपणे आपली जागा निश्चित केली आहे. स्कॉटलंडने डेन्मार्कचा 33 धावांनी पराभव करून पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर जर्मनीविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर आयर्लंडनेही पात्रतेचे तिकीट मिळवले.

रिची बेरिंग्टनच्या नेतृत्वाखाली स्कॉटलंड सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यांना पराभूत करणे कठीण होत आहे. त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या पाचपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी विरोधी संघाला खूप मेहनत घ्यावी लागेल असे दिसत आहे.

दुसरीकडे आयर्लंडने पाचपैकी चार सामने जिंकले असून अद्याप अपराजित आहे. त्यांचा जर्मनीविरुद्धचा सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय सोडला गेला. 2024 ICC टी-20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. 2007 मध्ये स्पर्धेची सुरुवात झाल्यापासून, एकही आवृत्ती संयुक्तपणे आयोजित केलेली नाही, त्यामुळे या वेळी ही स्पर्धा आणखी भव्य होण्याची अपेक्षा आहे.

या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार असून सुरुवातीला प्रत्येकी पाच संघांचे चार गट पहिल्या फेरीत भाग घेतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 मध्ये जातील तेथून पुन्हा सुपर 8 च्या शेवटी अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT