World Shooting Championship esakal
क्रीडा

World Shooting Championship : शिवा अन् इशानं भारताला जिंकून दिलं सुवर्ण; पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप

अनिरुद्ध संकपाळ

World Shooting Championship : भारताचे नेमबाज इशा सिंह आणि शिवा नरवाल यांनी अझरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक नमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकून दिले. भारताच्या या जोडीने अंतिम फेरीत टर्कीच्या इलायडा तरहान आणि युसूफ डिकेच या जोडीचा 16-10 ने पराभव केला.

बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने दोन पदके जिंकली आहेत. जरी इशा आणि शिवा यांनी पदक कमवाले असले तरी राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेते मेहुली घोष आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांची कामगिरी निराशाजनक राहिली.

बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. भारत सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाच सुवर्ण आणि दोन कांस्य पदक पटकावणारे चीन हे पहिल्या स्थानावर आहे.

भारतीय नेमबाजांनी सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दमदार कामगिरी केली. इशाने पात्रता फेरीत 290 गुण तर शिवा नरवालने 293 गुण मिळवले. या दोघांचे मिळून 583 गुण मिळवले होते. ते दोघेही पात्रता फेरीत अव्वल स्थानावर होते.

टर्कीच्या जोडीने एकूण 581 गुण मिळवले होते. ते पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिले. चीन आणि इराण यांनी प्रत्येकी 580 गुण मिळवले होते. मात्र इनर 10 मुळे चीन तिसऱ्या स्थानावर राहत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. भारताच्या नेमबाजांनी 10 मीटर रायफल प्रकारात मिश्र संघाने निराशाजनक कामगिरी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT