Ishaan Kishan Instagram Story Viral After Dropping From Team India For Asia Cup  esakal
क्रीडा

Ishaan Kishan : संघातून डच्चू मिळाल्यानंतर किशनची इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Ishaan Kishan : बीसीसीआयने आशिया कपसाठी (Asia Cup 2022) सोमवारी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली. या संघात धडाकेबाज सलामीवीर इशान किशन आणि संजू सॅमसन यांना संधी मिळाली नाही. संघाची घोषणा झाल्यावर आपले नाव संघात नसल्याचे पाहून इशान किशन चांगलाच नाराज झाल्याचे दिसत आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

आशिया कपसाठी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत असे दोन विकेटकिपर भारतीय संघात आहेत. जर या वर्षीच्या टी 20 क्रिकेटचा विचार केला तर सर्वात जास्त धावा करणाऱ्यांमध्ये इशान किशन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने या वर्षी 14 सामन्यात 430 धावा केल्या आहेत.

दरम्यान, इशान किशनने रॅपर 'बेला'च्या काही ओळी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केल्या.

इशान किशनचे गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली होती. मात्र गेल्या काही मालिकांमध्ये त्याला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्यात संघात केएल राहुल आणि विराट कोहली परतले आहेत. त्यामुळे इशान किशन, संजू सॅमसन यासारख्या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT