Ishan Kishan
Ishan Kishan 
क्रीडा

Ishan Kishan: आशिया चषकातून डावलल्यानंतर इशान किशनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Kiran Mahanavar

Ishan Kishan Asia Cup 2022 : बीसीसीआयने आशिया कपसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात धडाकेबाज सलामीवीर इशान किशन आणि संजू सॅमसन यांना संधी मिळाली नाही. संघाची घोषणा झाल्यावर आपले नाव संघात नसल्याचे पाहून इशान किशन चांगलाच नाराज झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे त्याने निवड समितीच्या निर्णयाला सार्थ ठरवले आहे. अलीकडेच, इशान किशनची एक मुलाखत समोर आली, ज्यामध्ये त्याने आशिया चषकात निवड न झाल्याने भावनिक वक्तव्य केले आहे.

इशान किशन म्हणाला, 'मला वाटते की निवडकर्ते जे करतात ते योग्य आहे. खेळाडूंची निवड करताना कोणाला आणि कुठे संधी द्यायची याचा खूप विचार केला. हे माझ्यासाठी सकारात्मक आहे कारण माझी निवड झाली नाही तर मी अधिक मेहनत करेन आणि अधिक धावा करेन. निवडकर्त्यांचा माझ्यावर विश्वास असेल तेव्हा ते मला संघात नक्कीच ठेवतील.

इशान किशन या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने 14 डावात 30.71 च्या सरासरीने 430 धावा केल्या आहेत. त्याने या वर्षात भारतासाठी तीन अर्धशतके झळकावली आहेत, ज्यात त्याच्या सर्वोत्तम 89 धावा आहेत. इशान किशनने यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून 14 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 32.15 च्या सरासरीने 418 धावा केल्या. त्याने संघासाठी 81 च्या वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्येसह तीन अर्धशतके झळकावली. इशान किशन त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असून तो नेहमीच भारतीय संघाला दमदार सुरुवात करून देत असतो.

  • आशिया कपसाठीचा भारतीय संघ :

    रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT