Ishan Kishan West Indies Vs India esakal
क्रीडा

Ishan Kishan : इशान किशनने रोहितचा विश्वास ठरवला सार्थ मात्र शुभमनचे येरे माझ्या मागल्या

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan West Indies Vs India : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात विंडीजने भारतासमोर 115 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करण्यासाठी भारताने आपल्या सलामी जोडीत बदल केला होता. कर्णधार रोहित शर्माने आपली जागा डावखुरा फलंदाज इशान किशनला दिली होती.

इशान किशन आणि शुभमन गिल या दोन युवा फलंदाजांनी सलामी दिली. मात्र ही सलामी यशस्वी ठरली नाही. शुभमन गिल अवघ्या 7 धावा करून माघारी परतला. त्याला विंडीज दौऱ्यावर फारशी चमक दाखवता आलेली नाही.

दुसरीकडे रोहित शर्माने विश्वासाने आपली जागा इशान किशनला दिली होती. त्याने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अर्धशतकी खेळी केली. मात्र तोही सामना फिनिश न करताच बाद झाला. विजयासाठी 25 धावांची गरज असताना तो बाद झाला.

भारताच्या दुसऱ्या फलंदाजांचा विचार केला तर गिल पाठोपाठ सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या देखील फेल गेले. सूर्यकुमारला फक्त 19 धावांचे योगदान देता आले. तर हार्दिक पांड्या 5 धावांवर धावबाद झाला.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीजने अत्यंत खराब फलंदाजी केली. विंडीजचा संपूर्ण संघ 23 षटकातच 114 धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून रविंद्र जडेजा 3 आणि कुलदीप यादव यांना 4 बळी टिपले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT