Ishan Kishan Nitish Rana esakal
क्रीडा

Ishan Kishan : इशान किशनला मित्रानेच दिला घरचा आहेर; 'लाईक' केला 15 सामन्यांचा कच्छा चिठ्ठा!

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan Nitish Rana : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारताची सलामी जोडी म्हणून इशान किशन आणि शुभमन गिल हे सातत्याने खेळत आहेत. मात्र या मालिकेत सूर्यकुमार यादव सोडला तर इतर कोणत्याही फलंदाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. तरी कर्णधार हार्दिक पांड्या इशान किशन आणि शुभमन गिलवर आपला विश्वास दाखवत आहे.

संघ व्यवस्थापन इशान किशन आणि शुभमन गिलला टी 20 मध्ये सातत्याने संधी देत आहे. इशान किशन आणि शुभमन गिल या दोघांनीही वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी केली आहे. मात्र त्यांना टी 20 क्रिकेटमध्ये लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. विशेषकरून शुभमन गिलने गेल्या 15 डावात 15.30 च्या सरासरी आणि 106.41 च्या स्ट्राईक रेने फक्त 199 धावा केल्या आहेत.

इशान किशनने 2023 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये 5 सामन्यात 12.60 च्या सरासरीने 63 धावा केल्या आहेत. त्याने लखनौमध्ये खेळलेल्या शेवटच्या सामन्यात 32 चेंडूत 19 धावा केल्या. अपघातामुळे दुखापतग्रस्त झालेल्या पंतच्या जागी इशान किशनला सातत्याने संधी मिळत आहे. मात्र त्याला संधीचं सोन करता येत नाहीये.

याचदरम्यान, एका क्रिकेट रसिकाने इशान किशनच्या गेल्या 15 सामन्यांचा कच्चा चिठ्ठा ट्विटरवर शेअर केला. इशान किशनला यंदाच्या हंगामात अजूनपर्यंत एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत 37 धावांची खेळी केली होती. हीच त्याची आतापर्यंतची हंगामातील सर्वोच्च खेळी ठरली.

दरम्यान, हे ट्विट दिल्लीचा डावखुरा फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या नितीश राणाने लाई केले. यानंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. नितीश राणाला भारतीय संघात शेवटचा 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर दिसला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघातून डच्चू मिळाला. तो अजूनही संघात स्थान मिळेल या आशेवर आहे. मात्र संजू सॅमसन फिट झाल्यानंतर तो टी 20 क्रिकेटमध्ये इशान किशनची जागा घेऊ शकतो. पृथ्वी शॉ देखील संघात परतला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT