Ishan Kishan sustained a head injury and was rushed to a hospital  esakal
क्रीडा

इशान किशनच्या डोक्याला दुखापत; रूग्णालयात केले दाखल

अनिरुद्ध संकपाळ

धरमशाला: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा सलामीवीर इशान किशनच्या (Ishan Kishan) डोक्याला दुखापत (Head Injury) झाली होती. त्याला हिमाचल प्रदेशमधील रूग्णालयात (Hospital) नेण्यात आले होते. इशान किशन बरोबरच श्रीलंकेचा फलंदाज दिनेश चंदीमलला (Dinesh Chandimal) देखील रूग्णालयात नेण्यात आले आहे. फिल्डिंग करत असतना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.

दरम्यान इशान किशनवर उपचार करणाऱ्या डॉ. शुभम यांनी सांगितले की, 'मला भारतीय क्रिकेट संघाकडून संपर्क करण्यात आला होता. मला माहिती देण्यात आली की भारतीय खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात आणण्यात आले. त्याचा सीटी स्कॅन (CT scan) करण्यात आला असून त्याला निरिक्षणाखाली (Under Observation) ठेवण्यात आले आहे.'

डॉ. शुभम पुढे म्हणाले की, 'श्रीलंकेचा खेळाडू देखील रूग्णालयात दाखल झाला आहे. त्याच्या अंगठ्याला दुसऱ्या टी 20 सामन्यात दुखापत झाली होती. आम्ही त्याच्यावरही लक्ष ठेवून आहोत सध्या परिस्थिती सामान्य आहे.'

दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 184 धावांचे तगडे आव्हान ठवले होते. मात्र भारतीय फलंदाजांनी हे आव्हान 18 व्या षटकातच पार करत मालिकेतला सलग दुसरा सामना जिंकला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) धडाकेबाज फलंदाजी करत 74 धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी करत भारताचा विजय साकारला. संजू सॅमसनने देखील 25 चेंडूत 39 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT