Ishan Kishan esakal
क्रीडा

Ishan Kishan : क्रिकेटमधून ब्रेक... किशनने कसोटी मालिकेतून माघार घेण्याचं वैयक्तिक नाही तर मानसिक कारण?

इशान किशन गेल्या वर्षभरापासून टीम इंडियासोबत आहे मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan Mental Fatigue : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. मात्र या संघात भारताचे तीन प्रमुख खेळाडू खेळत नाहीयेत.

ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत झाल्याने तो कसोटी मालिकेला मुकणार आहे. मोहम्मद शमी देखील दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासोबत नाहीये. याचबरोबर इशान किशनने देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याने यासाठी वैयक्तिक कारण दिलं आहे.

मात्र बीसीसीआयने इशान किशनने दौऱ्यातून का माघार घेतील आहे हे स्पष्ट केलेलं नाही. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार इशान किशनने मानसिक थकवा आल्याने दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून माघार घेतली आहे. तो क्रिकेट मालिकेसाठी सातत्याने प्रवास करत आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, 'व्यवस्थापनाला इशान किशनने सांगितले की त्याला मानसिक थकवा आला आहे आणि त्याला क्रिकेटमधून काही काळ ब्रेक हवा आहे.'

इशान किशन हा गेल्या वर्षभरापासून भारतीय संघासोबत आहे. त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची म्हणावी तशी संधी मिळाली नाही. त्याला वर्ल्डकपमध्ये देखील दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली. शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने त्याला संधी मिळाली होती.

बीसीसीआयने इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून वैयक्तिक कारणाने माघार घेतल्याचे सांगिले होते.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्राकात, 'इशान किशनने बीसीसीआयकडे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून वैयक्तिक करणाने रिलीज करण्यात यावं अशी विनंती केली होती. त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT