India Vs Pakistan Israel esakal
क्रीडा

India Vs Pakistan Israel : आम्ही खूश झालो, आता पाकिस्तानला... इस्राइलनं भारत - पाक सामन्यानंतर केलं ट्विट

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan Israel : वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत आपला सलग तिसरा विजय साजरा केला. भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा केलेला हा आठवा पराभव होता. यानंतर भारतात एकच जल्लोष करण्यात आला.

मात्र भारताच्या पाकिस्तानवरील विजयाचे पडसाद इस्राइलमध्ये देखील पडले आहेत. इस्राइनले आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका चाहत्याने हातात नरेंद्र मोदी आणि बेंजामिन न्येतन्याहू यांच्या मैत्रीपूर्ण फोटो अन् भारत इस्राइल सोबत असा मजकूर लिहिलेलं पोस्टर झळकावलं.

हा फोटो इस्राइलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला.

फोटो शेअर करून त्याला 'भारतीय मित्राने इस्राइलला पाठिंबा दिल्याने आम्ही खूप आनंदी झालो आहोत. वर्ल्डकप 2023 मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. पाकिस्तानला आता त्यांचा विजय दहशतवादी हमासला समर्पित करता येणार नाही.' असे कप्शन देखील दिले.

हमासने इस्राइलच्या नागरी वस्तीवर मिसाईल हल्ला केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही इस्राइलसोबत असल्याचे जाहीर केलं होतं. तर भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडू मोहम्मद रिझवानने आपली खेळी गाझा पट्टीतील लोकांना समर्पित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT