god medilist sakal nedia
क्रीडा

ज्युनिअर शूटिंग स्पर्धेत भारताचे ‘सुवर्ण दशक’

नऊ रौप्य व चार ब्राँझ पदकांसह तालिकेतही अव्वल; रिदमलाही तिसरे सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा

लिमा : येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग फेडरेशनच्या जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी भारताने दहावे सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू या जोडीने २५ मीटर रॅपिड फायर मिश्र स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत दिमाखदार कामगिरी बजावली.

सांगवान आणि सिद्धू यांनी थायलंडच्या कन्याकोर्न हिरुनफोम आणि श्वाकोन त्रिनिफक्रॉनचा ९-१ असा पराभव करत भारताच्या एकूण पदकांची आकडेवारी २३ वर नेली आणि पदतालिकेतील अव्वल स्थान भक्कम केले. १७ वर्षीय रिदम सांगवानचे हे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक ठरले. तिने १० मीटर आणि २५ मीटर महिला पिस्तूल सांघिक प्रकारातही पदक जिंकले आहे.

भारताच्या तेजस्विनी आणि अनिशने थायलंडच्याच चाविसा पदुका आणि राम खामहेंगविरुद्ध १०-८ ने विजय मिळवीत याच प्रकारातील ब्राँझपदक जिंकले, तर ज्युनिअर महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन (३ पी) प्रकारातील प्रसिध्दी महंत, निश्चल आणि आयुषी पोडर यांनी सांघिक रौप्यपदकाला गवसणी घातली.सांगवान आणि सिद्धू जोडगोळीने सुरुवातीपासूनच सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखत थाय जोडीला एकही फेरी जिंकू दिली नाही. दुसरीकडे ३ पी महिला प्रकारात भारताच्या संघाचा अमेरिकेच्या एलिझाबेथ मॅकगिन, लॉरेन झौन आणि कॅरोलिन टकर या त्रिकुटाने ४३-४७ असा पराभव केला. त्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असून, त्यात दोन पदक स्पर्धा नियोजित आहेत. दहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि चार ब्राँझ पदकांसह भारत सध्या पदकतालिकेत आघाडीवर असून त्यापाठोपाठ सहा सुवर्णांसह अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Protest : आमदार यड्रावकरांनंतर आता आवाडेंच्या साखर कारखान्याची ऊस वाहतूक अडवली; स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक

Tulsi Ganesha Curse Story: तुळशी मातेला श्रीगणेशाने का दिला होता श्राप? जाणून घ्या पौराणिक कथा

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये शेतकरी आक्रमक, टायर पेटवून समृद्धी महामार्ग रोखला

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT