Akhil Sheoran 
क्रीडा

Akhil Sheoran : अखिलचा पॅरिस ऑलिंपिकसाठी कोटा! जागतिक नेमबाजीत ब्राँझपदकाची कमाई; सांघिक गटात दोन सुवर्ण

सकाळ ऑनलाईन टीम

भारताच्या नेमबाजांनी बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधला. अखिल शेवरान याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. याचसोबत त्याने भारतासाठी पॅरिस ऑलिंपिक कोटाही प्राप्त केला. याच प्रकारात स्वप्नील कुसळे यानेही ऑलिंपिक कोटा मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्झँडर शमरील याने ४६२.६ गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. झेक प्रजासत्ताकच्या पीटर एन. याने ४५९.२ गुणांसह रौप्यपदक पटकावले. अखिल याने रविवारी भारताच्या दोन पदकांत मोलाचे योगदान दिले. त्याने ऐश्‍वर्य प्रताप सिंग तोमर व नीरजकुमार यांच्या साथीने पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. या उल्लेखनीय कामगिरीनंतर अखिल म्हणाला, जागतिक स्पर्धा दर चार वर्षांनी होत असतात. त्यामुळे माझ्यासाठी हे पदक व कोटा अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मला छान खेळ करता आला आहे. रौप्य व सुवर्ण मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सुवर्णपदक माझ्यापासून दूर होते हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दोन सुवर्णपदकांची कमाई

भारतीय नेमबाजांनी रविवारी अखिल शेवरानच्या ब्राँझपदकांसह आणखी दोन सुवर्णपदके कमावली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये भारताच्या खेळाडूंनी १७५० गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. भारताच्या या संघात अखिल शेवरान, ऐश्‍वर्य प्रताप सिंग तोमर व नीरजकुमार या खेळाडूंचा समावेश होता. भारताच्या महिला तिरदांजांनीही ठसा उमटवला. मनू भाकर, रिदम सांगवान, इशा सिंग या भारताच्या त्रिमूर्तींनी १७४४ गुणांची कमाई करताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

स्कीट मिश्र सांघिक प्रकारात भारतीय नेमबाजांना अपयशाला सामोरे जावे लागले. अंगद बाजवा व पारीनाज धालीवाल तसेच अनंत नारुका - गनिमत सेखो या जोड्यांना पदकांपासून दूरच राहावे लागले. अनंत - गनिमतची २५व्या स्थानावर, तर अंगद - पारीनाजची ३७व्या स्थानावर घसरण झाली.

सहा पदकांसह दुसरे स्थान

जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये चीनच्या नेमबाजांचे पहिले स्थान कायम आहे. चीनच्या नेमबाजांनी सात सुवर्ण, तीन रौप्य व तीन ब्राँझ अशी एकूण १३ पदकांची कमाई करीत पहिले स्थान पटकावले आहे. तसेच भारताने एकूण सहा पदकांसह दुसरे स्थान मिळवले आहे. यामध्ये तीन सुवर्ण व तीन ब्राँझपदकांचा समावेश आहे. अमेरिका दोन सुवर्ण व एक रौप्यपदकासह तिसऱ्या स्थानावर आहे.

पाचवा कोटा मिळवला

पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये होणार आहे. या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवासाठी भारताने आतापर्यंत पाच कोटा मिळवले आहेत. याआधी रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे व भाऊनीश मेंडीरट्टा यांनी ऑलिंपिक कोटा मिळवला होता. आता पॅरिस येथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये मेहुली घोष हिच्यानंतर रविवारी अखिल शेवरान यानेही दमदार कामगिरी करीत भारतासाठी कोटा मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT