james anderson and stuart broad pair created history 
क्रीडा

जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी लॉर्ड्स कसोटी सामन्यात एक खास विक्रम केला आहे.

Kiran Mahanavar

इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आपल्या भेदक माऱ्यासाठी ओळखले जातात. या जोडगोळीने अनेकवेळा इंग्लंडच्या विजयात मोठी भुमिका बजावली आहे. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी लॉर्ड्स कसोटी सामन्यात एक खास विक्रम केला आहे. या जोडीने एकत्र कसोटी क्रिकेट खेळताना 950 विकेट्स घेतल्या आहेत. शेन वॉर्न आणि ग्लेन मैकग्रा या जोडीने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकत्र 1001 विकेट घेतल्या आहेत. (james anderson and stuart broad pair created history)

1993-2007 दरम्यान शेन वॉर्न आणि ग्लेन मैकग्रा ऑस्ट्रेलियाकडून एकत्र कसोटी खेळले आहे. वॉर्नने 513 विकेट, तर मैकग्रा 488 विकेट घेतल्या आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ब्रॉड आणि अँडरसनची दुसरी जोडी आहे, त्यांनी एकत्र खेळताना 950 विकेट्स घेतल्या आहेत.

जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड ही पहिलीच वेगवान गोलंदाज जोडी आहे ज्याने एकत्र खेळून 950 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकाची जोडी चामिंडा वास आणि मुरलीधरन आहे. ज्यांनी एकत्र कसोटी खेळताना एकूण 895 विकेट घेतले.

वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये 1988 ते 2000 दरम्यान कोर्टनी वॉल्श आणि कर्टली अॅम्ब्रोस यांनी मिळून 762 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज वसीम अक्रान आणि वकार युनूस त्यांनी पाकिस्तानसाठी एकूण 61 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये दोघांनीही एकूण 559 विकेट्स घेतल्या होत्या. भारताकडून हरभजन आणि कुंबळे यांनी ५४ कसोटी सामने खेळून एकूण ५०१ विकेट्स घेतल्या आहेत.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 4 बाद 236 धावा केल्या होत्या. आतापर्यंत किवी संघाने इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या जोरावर 227 धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

Empire State Tower Proposal : प्रियसीला घेऊन १,४५४ फूट उंच टॉवरवर चढला; किस करत केलं प्रपोज, उतरवण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर, रस्ते केले बंद, सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai News : आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; प्रमोशन नाकारणाऱ्या 'लाडक्या' अभियंत्यांवर मेहेरनजर?

SCROLL FOR NEXT