IND vs ENG esakal
क्रीडा

IND vs ENG : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची Playing 11 जाहीर; 690 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला मिळाली नाही संधी

अनिरुद्ध संकपाळ

India Vs England James Anderson Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 25 जानेवारी पासून हैदराबाद येथे सुरू होत आहे. कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस आधीच पाहुण्या इंग्लंडने आपली प्लेईंग 11 घोषित केली आहे. इंग्लंडने हैदराबाद कसोटीत तीन फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे.

त्याच्या जोडीला मार्क वूड हा एकमेव वेगवान गोलंदाज असणार आहे. इंग्लंडने आपला सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनचा पहिल्या कसोटीसाठी विचार केलेला नाही. जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 690 विकेट्स घेतल्या आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हैदराबाद येथे खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटीतील खेळपट्टी ही फिरकीला साथ देण्याची शक्यता आहे. त्यामुळेत पाहुण्या इंग्लंड संघाने आपल्या प्लेईंग 11 मध्ये तीन फिरकीपटूंचा समावेश केला आहे. यात रेहान अहमद, जॅक लिच आणि टॉम हार्टली यांचा समावेश आहे.

वेगवान गोलंदाजांचा तगडा ताफा असलेल्या इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग 11 मध्ये एकच वेगवान गोलंदाज निवडला आहे. मार्क वूड हा एकमेव इंग्लिश गोलंदाज असणार आहे जो हैदराबादच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना दिसेल. अँडरनला डावलून त्याला संधी देण्यात आली आहे. बेन स्टोक्स देखील वेगवान गोलंदाजी करतो त्यामुळे मार्क वूड सोबत स्टोक्स नवीन चेंडू टाकताना दिसेल.

इंग्लंडची पहिल्या कसोटीसाठीची प्लेईंग 11 :

झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लीच.

इंग्लंडचा फिरकीपटू हार्टलीने सोमवारी विस्डेन क्रिकेट मंथलीला मुलाखत दिली होती. त्यावेळी तो म्हणाला की, 'मी यापूर्वी फक्त एकदाच भारत दौरा केला आहे. इथल्या खेळपट्ट्या फिरकीला फार पोषक असतात. तुम्हाला चेंडूला फ्लाईट देण्याची किंवा दुसरं काही विचार करण्याचा गरजच नसते. खेळपट्टी सर्वकाही करत असते.'

'काऊंटी क्रिकेटमधील खेळपट्ट्या या यापेक्षा खूप फ्लॅट असतात. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना तिथे अधिक कसब वापरावं लागतं. मात्र भारतात तुम्ही पूर्णपणे वर्चस्व गाजवू शकता.'

(Sports Latest New)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT