japans elimination ensures a new winner of the womens world football cup sakal
क्रीडा

महिला विश्‍वकरंडक फुटबॉल : यंदा नवा विश्‍वविजेता लाभणार; माजी विजेता जपान बाद

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या महिला विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेला नवा जेता मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

ऑकलंड : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या महिला विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेला नवा जेता मिळणार आहे. अमेरिका, जर्मनी व नॉर्वे या तीन माजी विजेत्यानंतर आता जपान या माजी विजेत्या देशाचेही आव्हान संपुष्टात आले.

स्वीडनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानवर २-१ असा विजय मिळवला आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर स्पेनचे आव्हान असणार आहे. स्पेनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नेदरलँड संघावर २-१ असा विजय साकारला व आगेकूच केली.

जपानने २०११ मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. तसेच २०१५ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदाच्या स्पर्धेमध्येही त्यांनी साखळी फेरीत घवघवीत यश संपादन केले. अंतिम १६ फेरीच्या लढतीत जपानने नॉर्वेवर ३-१ अशी मात केली. या सर्व लढतींमध्ये पहिला गोल जपानकडूनच करण्यात आला होता.

जपानला मात्र स्वीडनविरुद्धच्या लढतीत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. अमांडा इस्टेड हिने ३२ व्या मिनिटाला स्वीडनसाठी पहिला गोल केला. जपान प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच मागे राहिला. फिलीप्पा अँजेलदाल हिने ५१ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. जपानकडून ८७ व्या मिनिटाला गोल करण्यात आला. होनोका हयाशी हिने हा गोल केला.

१३ वर्षांमध्ये तिसऱ्यांदा अंतिम चारमध्ये

स्वीडनच्या महिला फुटबॉल संघाने २०११ पासून आयोजित करण्यात आलेल्या विश्‍वकरंडकात ठसा उमटवला आहे. २०११, २०१९ या दोन वर्षांमध्ये झालेल्या विश्‍वकरंडकात स्वीडनने अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता. आता २०२३ मध्येही त्यांनी याची पुनरावृत्ती केली. स्वीडनला २०११ व २०१९ मध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avian Influenza: देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी; 'हे' नियम पाळले नाहीत तर मोठा धोका

ती मला भेटायला का नाही आली? घराला कुलूप, अचानक झाली गायब; रजनीकांत यांचं ते प्रेम ज्याचा घाव आजही ताजा आहे

Pune Traffic Police : नववर्षाच्या रात्री पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे!

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

Junnar Migratory Bird : युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्डची जुन्नर तालुक्यात प्रथमच नोंद; जैवविविधतेसाठी ऐतिहासिक क्षण!

SCROLL FOR NEXT