Jasprit Bumrah Record sakal
क्रीडा

पुन्हा बूमराहच नंबर 1, इंग्लंडमधील अफलातून कामगिरीनंतर मानाचा शिरपेच

इंग्लंडविरुद्ध अप्रतिम कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज बनला आहे.

Kiran Mahanavar

Jasprit Bumrah returns to No1 position in ICC Ranking : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसीच्या टॉप वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत जलवा दाखवत आहे. जसप्रीत बुमराह आता 718 रेटिंगसह क्रमवारीत पहिल्या स्थानावर आला आहे. यापूर्वी तो चौथ्या स्थानावर होता.

बुमराहने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकून अव्वल स्थान मिळवले आहे. बोल्ट आता दुसऱ्या स्थानावर आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध अप्रतिम कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज बनला आहे.

बुमराह एकूण 730 दिवस एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला होता. जे इतर कोणत्याही भारतीय खेळाडूपेक्षा जास्त आहे. याआधी बुमराह टी-20 चा नंबर-1 गोलंदाजही राहिला आहे. कसोटी क्रमवारीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा हे देखील वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.

एकदिवसीय क्रमवारीत अव्वल 10 गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त एकही भारतीय नाही. लेगस्पिनर युजवेंद्र चहलचा टॉप-20 मध्ये समावेश झालेला भारतीय गोलंदाज आहे. तो 20 व्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी 23व्या तर भुवनेश्वर कुमार 24व्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT