Team India’s pace spearhead Jasprit Bumrah is set to make his comeback in the 4th Test match against England at Manchester, boosting the bowling attack.  esakal
क्रीडा

Jasprit Bumrah: ‘जसप्रीत बुमराह’बाबत मोठी अपडेट!, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत आता टीम इंडिया...

India vs England 4th Test: मँचेस्टर येथे होणारी चौथी कसोटी ही टीम इंडियासाठी करा किंवा मरा अशा स्थितीतील आहे, अशावेळी टीम इंडियाला बुमराहची प्रचंड गरज आहे

Mayur Ratnaparkhe

Jasprit Bumrah and Manchester Test: सध्या भारत आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यापैकी आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले गेले असून, त्यात इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. तर आता चौथा कसोटी सामना बुधवार २३ जुलैपासून मँचेस्टर येथी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता टीम इंडियाबद्दल एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

मँचेस्टर येथील कसोटी ही भारतासाठी करा किंवा मरा अशी असणार आहे. कारण, या मालिकेतील आपलं आव्हान जर कायम राखायचं असेल तर टीम इंडियाला ही कसोटी कसंही करून जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे दोन कसोटी सामने जिंकून मालिकेत आघाडी घेणाऱ्या इंग्लडचा आता ही चौथी कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असणार आहे.

अशावेळी भारतीय संघात भारताचा हुकमचा एक्का म्हणजेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेला धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत हे दोघेहीजण असणार की नाही, याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. खरंतर या दोघांची संघाला आता सर्वात जास्त गरज असणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवरच टीम इंडियासाठी दिलासदायक अशी बातमी समोर आली आहे. कारण, स्काय स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराह उपलब्ध असणार आहे. खरंतर मालिका सुरू होण्याआधीच बुमराहने सांगितलं होतं की, तो त्याच्या वर्कलोडमुळे केवळ तीन कसोटी सामने खेळेल आणि तो बर्मिंगहॅममध्ये दुसरा कसोटी सामना खेळला देखील नव्हता. त्यामुळेच आता टीम इंडियासाठी करा किंवा मरा अशी परिस्थिती असताना उत्तम फॉर्ममध्ये असणारा बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार की नाही, याबाबत वेगवेगेळे अंदाज वर्तवले जात होते.

आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कसोटी मालिकेत बुमराह उत्तम फॉर्ममध्ये दिसून आला आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात तर त्याने पाच विकेटही घेतल्या आहेत. तर लॉर्ड्स कसोटी त्याने एकूण सात विकेट घेतल्या अशाप्रकारे दोन्ही कसोटीत त्याने १२ विकेट घेतल्या आहेत. आता चौथ्या कसोटीत बुमराहच्या आगमनामुळे भारताची गोलंदाजी अधिकच बळकट झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार धाकट्या सुनेची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

PMC Election : प्रचारासाठी मैदान, चौक वापरायचा असेल तर पैसे मोजा; पुणे महापालिकेचे निवडणूक शुल्क जाहीर!

Thane Politics: कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम, पोटेंच्या आरोपांना रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT