Jasprit Bumrah sakal
क्रीडा

Jasprit Bumrah : गोलंदाजांना श्रेय याचा फार आनंद,बुमरा ; रिझवानला बाद केले तेथेच सामन्याला कलाटणी मिळाली!

फलंदाजांचे अपयश गोलंदाजांनी धुऊन काढले आणि या लढ्याचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमरा भारताने ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारतीय संघाच्या विजयाचे श्रेय गोलंदाजांना मिळाले, याचा फार आनंद झाला असल्याची भावना बुमराने व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : फलंदाजांचे अपयश गोलंदाजांनी धुऊन काढले आणि या लढ्याचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमरा भारताने ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारतीय संघाच्या विजयाचे श्रेय गोलंदाजांना मिळाले, याचा फार आनंद झाला असल्याची भावना बुमराने व्यक्त केली.

टी २० प्रकारात २० पैकी १८ सामन्यांत फलंदाजांचा बोलबाला असतो. खेळपट्ट्या फलंदाजीला खूप पोषक बनवल्या जातात, ज्याचा फायदा घेत फलंदाज वारंवार गोलंदाजांवर हल्ला चढवत असतात. या विश्वकरंडक स्पर्धेत खासकरून नासाऊ कौंटीच्या मैदानावर चित्रं उलट आहे. या मैदानावर गोलंदाज फलंदाजांना नामोहरम करून सोडत आहेत. भारतीय फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीने पाकिस्तानसमोर विजयासाठी १२० धावांचे लक्ष्य होते. टी २० क्रिकेटमध्ये ही धावसंख्या पुरेशी मानली जात नाही. भारतीय गोलंदाजांनी तरीही विजयाचा मार्ग संघाला मोकळा करून दाखवताना केलेला अचूक मारा बराच काळ चर्चेत राहणार आहे.

असा होता संघाचा प्लान

आम्ही फलंदाजी करताना अपेक्षित काम केले नाही. ११९ धावा नक्कीच कमी होत्या, पण आम्ही विचार केला की गोलंदाजी करताना उतावळेपणा करायचा नाही. प्रत्येक चेंडूवर फलंदाजाला बाद करायचा विचार करायचा नाही, ज्याने दडपण गोलंदाजांवर येते. मधून कोणी चौकार षटकार मारला तरी गोंधळून जायचे नाही. पाकिस्तानची फलंदाजी चालू होताना हवा बदलली विकेटही थोडे चांगले झाले. तरीही थोडी मदत मिळणार होती. म्हणून मग टप्पा दिशा धरून अचूक मारा करत राहायचे आणि फलंदाजांना चूक करायला भाग पाडायचे, असे ठरले आणि आम्ही नेमके तेच केले, असे जसप्रीत बुमरा सामन्यानंतर बोलताना म्हणाला.

सामन्यात उतरताना कोण काय बोलत आहे, कोणाच्या काय अपेक्षा माझ्याकडून आहेत याचा मी जास्त विचार करत नाही. गोलंदाजी करताना मी माझी बलस्थाने काय आहेत याचा अभ्यास करून मी ठरवलेल्या जागी चेंडू वारंवार टाकू शकतो का नाही, याकडे फक्त लक्ष देतो. पाकिस्तानसमोरच्या सामन्यात मला तेच करायचा फायदा झाला, असे बुमराने सांगितले.

येथे मिळाली कलाटणी

डावातील १५ वे आणि माझे तिसरे षटक महत्त्वाचे होते. रिझवान चांगली फलंदाजी करत होता. त्या षटकात जर पाकिस्तानी फलंदाजांनी १० धावा काढल्या असत्या तर सामना त्यांच्याकडे झुकला असता. मला रिझवानला त्रिफाळाचीत करता आले, तिथे सामन्याला थोडी कलाटणी मिळाली. मग दडपण आम्हीही वाढवत गेलो. माझ्या नंतर लगेच अक्षरने टाकलेले षटकही मोलाचे ठरले. एकंदरीतच सर्व गोलंदाजांनी मस्त मारा केला, असे जसप्रीत बुमरा सांगत होता.

टीव्ही लगेच बंद करतो...

जेव्हा टी- २० सामन्यात गोलंदाजांना खेळपट्टीकडून काहीच मदत मिळत नाही आणि फक्त फलंदाज राज्य करतात तेव्हा मला सामना बघायला आवडत नाही. मी लगेच टीव्ही बंद करतो. क्रिकेटमध्ये बॅट-बॉल मध्ये युद्ध झाले पाहिजे. इथल्या विकेटवर तसे होताना दिसत आहे. मदत करणाऱ्‍या विकेटसवर गोलंदाज फलंदाजांना सतत प्रश्न विचारत आहेत. सामन्यातील यशाचे मुख्य श्रेय गोलंदाजांना मिळत आहे याचा मला मनापासून आनंद होतो आहे, जसप्रीत बुमरा हसत हसत म्हणाला.

बुमराच्या रविवारच्या सामन्यातील कामगिरीचे कौतुक महान माजी पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रमनेही केले. बुमरा कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी मारा करून परिणाम साधून शकतो, असे वसीम अक्रमने बुमराचे कौतुक करताना सांगितले. भारतीय कप्तान रोहित शर्मानेही बुमराचे कौतुक करताना फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नसताना भारतीय गोलंदाजांनी उचल खात संघाला महत्त्वाचा विजय मिळवून दिल्याचे कबूल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT