Jasprit Bumrah Sakal
क्रीडा

वा रे माझ्या नवरोबा, तू तर... संजनाचं बुमराहसाठी खास ट्विट

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या डे नाइट सामन्यात जसप्रित बुमराहने कमालीची कामगिरी नोंदवली. कसोटी कारकिर्दीत घरच्या मैदानावर त्याने पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या. बंगळुरुच्या मैदानात सुरु असलेल्या डे-नाइट टेस्ट (Day Night Test) कसोटी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला अवघ्या 109 धावांत गुंडाळले. ज्या खेळपट्टीवर पहिल्यांदा फिरकीची जादू दिसली त्या मैदानात जसप्रित बुमराहनं (Jasprit Bumrah) कहर केला. बुमराहनं आठव्यांदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या असल्या तरी घरच्या मैदानात पहिल्यांदाच त्याने ही कामगिरी करुन दाखवलीये.

बंगळुरुच्या कसोटी सामन्यात बुमराहने 10 षटकात 24 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या. यात त्याने 4 षटके निर्धाव टाकली. त्याच्याशिवाय भारताकडून मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन, अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

कसोटीत जसप्रित बुमराहचा 'फाइव विकेट हॉल-

1. 27-6 विरुद्ध वेस्ट इंडीज (किंग्सटन)

2. 33-6 विरुद्ध ऑस्ट्रेलिया (मेलबर्न)

3. 7-5 विरुद्ध वेस्ट इंडीज (नॉर्थ साउंड)

4. 24-5 विरुद्ध श्रीलंका (बंगळुरु)

5. 42-5 विरुद्ध दक्षिण आफ्रिका (केपटाउन)

6. 54-5 विरुद्ध दक्षिण आफ्रिका (जोहन्सबर्ग)

7. 64-5 विरुद्ध इंग्लंड (नॉटिंघम)

8. 85-5 विरुद्ध इंग्लंड (नॉटिंघम)

जसप्रित बुमराहच्या कामगिरीनंतर त्याची पत्नी संजना गणेशन हिने ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. अब तक आठ....हे काउंट डाउन सुरुच राहिल. तुझ्या या कामगिरीचा अभिमान आहे, असा उल्लेखही तिने केला आहे. संजना गणेशन सध्या न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये अँकरिंग करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT