India vs England Test Series  sakal
क्रीडा

IND vs ENG : हैदराबादमधील पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! ICC ने जसप्रीत बुमराहवर घेतली अॅक्शन

India vs England Test Series News 2024 :

Kiran Mahanavar

India vs England Test Series :

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला हैदराबादमध्ये सुरुवात झाली. आणि पहिल्याच सामन्यात इंग्लंड संघाने यजमान भारतावर 28 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने मागे आहे. त्याच बरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही भारताचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर आता आयसीसीने भारतालाही अजून एक मोठा धक्का दिला आहे. आयसीसीने भारतीय दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर कारवाई केली आहे.

बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणताही खेळाडू, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही अधिकारी किंवा व्यक्तीला शारीरिक धक्का लागू नये. याव्यतिरिक्त, बुमराहच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे, ज्यांच्यासाठी 24 महिन्यांच्या कालावधीत हा पहिला गुन्हा होता.

बुमराहकडून चुक कधी झाली तर, ही घटना इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 81 व्या षटकात घडली. बुमराह जाणूनबुजून ओली पोपच्या मध्ये आला होता. बुमराहच्या कृतीमुळे अयोग्य शारीरिक संपर्क झाला.

काय घडलं मॅचमध्ये?

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 246 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा केल्या आणि 190 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 420 धावा केल्या आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया 202 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारत हारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT