Jasprit Bumrah
Jasprit Bumrah Sakal
क्रीडा

संधी मिळाली तर टेस्टचा कॅप्टन व्हायला आवडेल : बुमराह

सुशांत जाधव

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय वनडे संघाचा उप कर्णधार जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वासंदर्भात मोठं विधानं केले. जर मला संधी मिळाली तर कॅप्टन्सीचा ताज मिरवायला आवडेल, असे तो म्हणाला. यावेळी त्याने कोहलीसंदर्भातही भाष्य केले. कोहलीनं जरी संघाचे नेतृत्व सोडले असले तरी तो लोकेश राहुलला योग्य ती मदत करत राहील, असा विश्वास त्याने व्यक्त केला. (Jasprit Bumrah Press Conference He Ready For Test Captaincy)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) दुखापतग्रस्त झाला होता. परिणामी अखेरच्या कसोटी सामन्याला त्याला मुकावेही लागले होते. स्नायू दुखापतीतून तो सावरला असून वनडेसाठी तो सज्ज असल्याची माहितीही बुमराहनं (Jasprit Bumrah) यावेळी दिली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना 19 जानेवारीला रंगणार आहे. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी उप कर्णधार जसप्रीत बुमराहनं प्रसारमाध्यमांसमोर अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

विराट कोहीलच्या निर्णयाचा सन्मान

विराट कोहलीने टेस्ट कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णयावर बुमराह म्हणाला की, हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही सर्व या निर्णयाचा आदर करतो. मी स्वत: कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामना खेळला होता. तो पुढेही नव्या कॅप्टनची मदत करेल. विराट कोहलीने टीम मिटिंगमध्ये आम्हाला नेतृत्व सोडणार असल्याची गोष्ट सांगितली होती. त्यानंतरच त्याना सार्वजनिकरित्या आपला निर्णय शेअर केला, असेही बुमराहने सांगितले.

उप कर्णधार पदाचा दबाव नाही

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे कर्णधारपद आले. याचवेळी आश्चर्यकारकरित्या बुमराहला उप कर्णधार करण्यात आले. अतिरिक्त जबाबदारीचा कोणताही दबाव घेणार नाही. प्रत्येकालाच जबाबदारी घेणं आवडते. मी त्याला अपवाद नाही.

कॅप्टन्सी बदलाचा भारतीय संघावर काही परिणाम होईल का? असा प्रश्नही यावेळी जसप्रीत बुमराहला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, कॅप्टन्सी बदलाचा संघावर फारसा प्रभाव पडतो असे मला वाटत नाही. एक टीम म्हणून सर्वजण उत्तम योगदान देण्यासाठी मैदानात उतरत असतात. सकारात्मकता ही महत्त्वाची गोष्ट असते. कॅप्टन्सी बदलामुळे त्यावर काहीही परिणाम होईल असे वाटत नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघ 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने तयारी करत आहे, असेही त्याने यावेळी सांगितले.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे वेळापत्रक

पहिला वनडे सामना- 19 जानेवारी, बोलँड पार्क, पर्ल

दुसरा वनडे सामना- 21 जानेवारी, बोलैंड पार्क, पर्ल

तिसरा वनडे सामना- 23 जानेवारी, न्यूलँड्स, केप टाऊन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT