Jasprit Bumrah sakal
क्रीडा

Jasprit Bumrah Icc Ranking : बूम बूम बुमरा जगात पहिला ; क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या जसप्रीत बुमराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

दुबई : विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या जसप्रीत बुमराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीत तो अव्वल स्थान मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.

कसोटी क्रिकेटमधील रँकिंगमध्ये अशा प्रकारे तिन्ही प्रकारात अव्वल क्रमांक मिळवणारा बुमरा विराट कोहलीनंतरचा पहिला भारतीय ठरला आहे. या दुसऱ्या कसोटीत नऊ विकेट मिळवण्याची कामगिरी करून भारताला विजय मिळवून देणाऱ्या बुमराने अव्वल स्थान मिळवताना आपल्या देशाच्या रविचंद्रन अश्विनला मागे टाकले. अश्विनने या क्रमांकांवर ११ महिने कायम होता. ४९९ कसोटी विकेट नावावर असलेल्या अश्विनची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

आत्तापर्यंत गोलंदाजीच्या क्रमवारीत पहिले रँकिंग मिळवणारा तो चौथा भारतीय गोलंदाज आहे. या अगोदर हा सन्मान बिशनसिंग बेदी, अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी मिळवलेला आहे. बुमराच्या नावावर ८८१ रेटिंग गुण आहेत. अश्विन आणि जडेजा यांनी अव्वल स्थान मिळवताना अनुक्रमे ९०४ आणि ८९९ रेटिंग गुणांची कमाई केली होती. मार्च २०१७ मध्ये अश्विन आणि जडेजा एकत्रितपणेही पहिल्या क्रमांकावर होते.

यशस्वीचीही प्रगती

विशाखापट्टण येथील कसोटीत पहिल्या डावात द्विशतक करणारा भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल यानेही रँकिंगमध्ये चांगली प्रगती केली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत त्याने ३७ वरून तो २९ व्या स्थानावर आला आहे; तर दुसऱ्या डावातील शतकवीर शुभमन गिल याने १४ गुणांची प्रगती करत तो ३८ व्या स्थानावर आहे.

टॉप टेनमध्ये तीन भारतीय

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताजा रँकिंगमध्ये गोलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या दहा जणांत जसप्रीत बुमरा (१), रविचंद्रन अश्विन (३) आणि रवींद्र जडेजा (८) असे तीन गोलंदाज आहेत.

भारताचे आतापर्यंतचे अव्वल नंबरी

कसोटी :(फलंदाजी) : सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली.

एकदिवसीय :सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शुभमन गिल.

ट्वेन्टी-२० : गौतम गंभीर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव.

(गोलंदाजी) :

कसोटी : बिशनसिंग बेदी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा.

एकदिवसीय : कपिलदेव, मनिंदर सिंग, अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.

ट्वेन्टी-२० : जसप्रीत बुमरा, रवी बिश्नोई.

(अष्टपैलू) : कसोटी : कपिलदेव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा.

एकदिवसीय : कपिलदेव.

एलिट गोलंदाजांमध्ये बुमरा

१५० पेक्षा अधिक विकेट मिळवणाऱ्यांमध्ये कमीत कमी सरासरी असलेले सार्वकालिक गोलंदाज त्यातही बुमरा दुसरा

गोलंदाज विकेट सरासरी

सिडनी बर्न्स १८९ १६.४३

जसप्रीत बुमरा १५५ २०.१९

अॅलन डेव्हिसन १८६ २०.५३

माल्कम मार्शल ३७६ २०.९४

ज्युएल गार्नर २५९ २०.९७

कर्टली अॅम्ब्रोस ४०५ २०.९९

जिम लेकर १९३ २१.२४

फ्रेड ट्रुमन ३०७ २१.५७

ग्लेन मॅकग्रा ५६३ २१.६४

कागिसो रबाडा २९१ २२.०५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT