Jasprit Bumrah IND vs ENG  esakal
क्रीडा

Jasprit Bumrah IND vs ENG : तुमचे षटक लवकर पूर्ण करा.... जसप्रीत बुमराह फिरकीपटूंना असं का म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah IND vs ENG : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 6 विकेट्स घेतल्या. मात्र भारताला पहिल्या सामन्यात 28 धावांनी पराभव सहन करावा लागला. बुमराहच्या दमदार गोलंदाजीला प्रत्युत्तरत देत ओली पोपने 196 धावांची खेळी केली. तर पदार्पण करणाऱ्या टॉम हार्टलीने 7 विकेट्स घेतल्या.

जसप्रीत बुमराहने हैरदाबादच्या खेळपट्टीतून काही मदत मिळत नसताना दमदार गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. दरम्यान या सामन्यावेळी जसप्रीत बुमराहने भारतीय फिरकीपटूंना सल्ला देत होता. तो त्यांच्या मागे लागला होता की तुम्ही तुमचे षटक लवकर पूर्ण कराय.

जसप्रीत बुमराह ब्रॉडकास्टर्सशी बोलताना म्हणाला की, 'मी सामन्यावेळी प्रत्येकाच्या सतत मागे लागलो होतो. भारतात चेंडू हा सॉफ्ट होतो. त्यामुळे तुम्हाला चेंडूची काळजी घ्यावी लागते. आता चेंडूला लाळ लावलता येत नाही. त्यामुळे चेंडूची काळजी घेणं एका बाजूची शाईन कायम ठेवणं अवघड झालं आहे. मी फिरकीपटूंच्या कायम मागे लागतो. तुमचे षटक लवकर पूर्ण करा आणि बॉल शाईन करत रहा.'

जसप्रीत पुढे म्हणाला की, 'हो नक्कीच मी प्रत्येकाच्या मागं हात धुवून लागतो. जर चेंडूची काळजी घेतली तर त्याचा अतिरिक्त फायदा मिळतो.'

पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटी भारतीय गोलंदाजांवर दबाव आहे. इंग्लंडच्या फलंदाजांचा आक्रमक बाणा रोखणे अन् रिव्हर्स स्विप आणि स्विच हिटवर उतारा शोधण्याचं आव्हान रोहित आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहवर असणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT