India vs Afghanistan  esakal
क्रीडा

India vs Afghanistan : भारत - अफगाणिस्तान मालिकेचा मुहूर्त ठरला; जय शहांनी केलं शिक्कामोर्तब

अनिरुद्ध संकपाळ

India vs Afghanistan : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिका होणार असल्याची माहिती दिली. ही वनडे मालिका आधी जून महिन्यात होणार होती. मात्र दोन्ही क्रिकेट बोर्डाच्या सहमतीने ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती. पूर्वी ही तीन सामन्यांची मालिका 23 जून ते 30 जून या दरम्यान होणार होती. आता ही मालिका जानेवारी 2024 मध्ये होणार आहे.

जय शहा यांनी शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या एपेक्स काऊन्सीलच्या बैठकीवेळी या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला. शहा यांनी देशातील द्विपक्षीय सामन्यांसाठी नव्या माध्यम हक्क करार प्रक्रिया ऑगस्टच्या अखेरपर्यंत पूर्ण करणार असल्याची देखील घोषणा केली. हा करार पुढच्या चार वर्षासाठी असणार आहे.

जय शहा म्हणाले की, 'बीसीसीआयची नवीन माध्यम हक्क डील ही ऑगस्टच्या शेवटीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर आठ सामन्यांची ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होईल. यात तीन वनडे सामने हे वर्ल्डकपपूर्वी आणि पाच टी 20 सामने हे वर्ल्डकप नंतर होणार आहेत.'

शहा यांनी सांगितले की, बीसीसीआय एशियन गेम्स 2023 पूर्वी भारतीय वरिष्ठ महिला संघासाठीचा संपूर्ण कोचिंग स्टाफ हा निवडला जाईल. बीसीसीआय चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 मध्ये भारताचा पुरूष आणि महिला क्रिकेट संघ पाठवणार आहे.

शहा म्हणाले, 'आम्ही एशियन गेम्समध्ये सहभागी होणर आहे. एपेक्स काऊन्सीलने याबाबत परवानगी दिली असून आमचा पुरूष आणि महिला संघ चीनमधील एशियन गेम्समध्ये खेळणार आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT