Asia Cup 2023 BCCI vs PCB esakal
क्रीडा

Asia Cup 2023 BCCI vs PCB : जाळ अन् धूर निघाला संगटच! शहा - सेठी बैठकीत भिडले

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 BCCI vs PCB : आशिया कप 2023 च्या आयोजन आणि यजमानपदावरून भारत - पाकिस्तान यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भारताचा पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास विरोध आहे. त्यामुळे आशिया कप 2023 चे यजमान पद जरी पाकिस्तानकडे असले तरी स्पर्धा मात्र त्रयस्थ ठिकणी खेळवण्याकडे एशिया क्रिकेट काऊन्सीलचा कल आहे. याबाब अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

दरम्यान, नुकत्याच बहरीनमध्ये झालेल्या एशियन क्रिकेट काऊन्सीलच्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नमज सेठी आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यात जबरदस्त खडाजंगी झाल्याचे समजते.

एका एसीसी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 'बैठकीत तू तू मैं मैं झाल्याने शहा आणि सेठी यांच्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नजम सेठी हे जय शहा यांच्याशी उर्मटपणे बोलत होते. ते पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपसाठी भारतात येणार नाही अशी धमकी देत होते.'

दरम्यान, एसीसी अधिकाऱ्याने सांगितले की आशिया कप 2023 च्या ठिकाणाबाबतचा अंतिम निर्णय हा पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र असे असले तरी यापूर्वीच स्पर्धा ही पाकिस्तानातून हलवून त्रयस्थ ठिकाणी घेण्यात येईल असं ठरलं आहे.

एसीसी अधिकारी पुढे म्हणाला की, 'स्पर्धा ही शंभरटक्के पाकिस्तानातून हलवली जाईल. सर्व एसीसी सदस्य हे बीसीसीआयची बाजू समजून घेत आहेत आणि भारताच्या बाजूनेच आहेत.'

बैठकीवेळी काय झालं?

- बीसीसीआयने स्पष्ट केलं की आमचे सरकार पाकिस्तानात संघ पाठवण्यास परवानगी देणार नाही.

- बीसीसीआयला त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानशी खेळण्यात कोणतीच अडचण नाहीये.

- जर पाकिस्तान त्रयस्थ ठिकाणी आशिया कप आयोजित करण्यास तयार झाले तर स्पर्धा अबु धाबी, दुबई आणि शारजाहमध्ये आयोजित करण्यात येईल.

- पीसीबीने एसीसीला सांगितले की आशिया कप पाकिस्तानमधून बाहेर हलवण्याबाबत आम्हाला पाकिस्तान सरकारसोबत याबाबत बोलून त्यांची परवानगी घ्यावी लागेल.

(Sports Latest News)

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT