Jay Shah Trolled 
क्रीडा

Jay Shah Trolled : 'पप्पांना सांग चांगला नागरिक होण्यासाठी तिरंगा फडकवण्याची गरज नाही'

जय शाहने भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान तिरंगा ध्वज हातात घेण्यास नकार दिला होता, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kiran Mahanavar

Jay Shah Trolled Asia Cup 2022 India Vs Pakistan : आशिया कपच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने भारताला 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना जिंकून दिला. यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू झाला. भारताचे चाहते या विजयाचे सेलिब्रेशन हातात तिरंगा घेऊन करत होते.

बीसीसीआय सचिन आणि देशाचे गृहमंत्री (अमित शाह) यांचा मुलगा जय शाह यांनी भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान तिरंगा हातात फडकावण्यास नकार दिला. हार्दिक पांड्याने निर्णायक षटकार बॅटमधून आल्यानंतर ही घटना घडली. भारतीय संघाच्या विजयानंतर एक व्यक्ती जय शाहला तिरंगा फडकवण्यासाठी हातवारे करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, मात्र जय शाहने ध्वज हातात धरण्यास नकार दिला आहे.

जय शाहच्या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. जय शाहला तिरंगा फडकवण्याची अॅलर्जी आहे का असा सवाल एका यूजरने केला. आणखी एका युजरने लिहिले की, "जय शाहने आपल्या वडिलांना सांगावे की राष्ट्रध्वज फडकावणे किंवा राष्ट्रगीतावर उभे राहणे हे देशभक्तीचे लक्षण नाही. अशा अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

सोशल मीडियावर एक गट देखील आहे जो जय शाहचा बचाव करताना दिसत आहे. जय शाहच्या समर्थकांचे म्हणणे आहे की तो आशियाई क्रिकेट परिषदेचा सदस्य आहे, त्यामुळे तो कोणत्याही एका देशाचे समर्थन करू शकत नाही. यामुळे त्यांनी तिरंगा उचलण्यास नकार दिला. आशिया चषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती, मात्र या सामन्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून दमदार खेळ पाहायला मिळाला नाही. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या कारणावरून नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT