Jaydev Unadkat picked for Bangladesh Tests in place of injured Mohammed Shami  sakal
क्रीडा

IND vs BAN Test Squad: BCCI ने घेतला मोठा निर्णय! 12 वर्षांनंतर घातक गोलंदाजाची संघात एंट्री

मोहम्मद शमीच्या जागी 'या' घातक गोलंदाजाची एंट्री!

Kiran Mahanavar

IND vs BAN Test Squad : एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 1 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी 12 वर्षांनंतर घातक गोलंदाजाची संघात एंट्री होत आहे. वृत्तानुसार, विजय हजारे ट्रॉफीमध्ये नुकताच सौराष्ट्रला चॅम्पियन बनवणारा खेळाडू जयदेव उनाडकटचा त्याच्या जागी समावेश करण्यात येणार आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, जयदेव उनाडकटच्या जागी मोहम्मद शमीची वर्णी लागणार आहे. जयदेव उनाडकटने भारतासाठी 1 कसोटी, 7 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला कसोटीत एकही विकेट घेता आली नाही. त्याने एकदिवसीय सामन्यात 8 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत.

उनाडकटने भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर तो एकही कसोटी खेळू शकला नाही. 2010 मध्ये तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्याने 1 डावात 26 षटके टाकली. मात्र 1 विकेटही काढता आली नाही.

उनाडकट हा विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये सौराष्ट्र संघाचा कर्णधार होता. या स्पर्धेत त्याने 10 सामन्यांत एकूण 19 बळी घेतल्या. त्याच्या नेतृत्वाखाली 14 वर्षांनंतर सौराष्ट्र चॅम्पियन झाला. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. उनाडकटने त्याच्या 96 सामन्यांच्या कारकिर्दीत 353 बळी घेतल्या आहेत. ज्यामध्ये रणजी ट्रॉफीच्या 2019-20 च्या विक्रमी हंगामाचाही समावेश आहे. ज्यामध्ये त्याने 67 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT