Jhulan Goswami all record sakal
क्रीडा

Jhulan Goswami : 'चकड़ा एक्सप्रेस'चा प्रवास थांबणार! जाणून घ्या सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर

200 किंवा त्याहून अधिक वनडे विकेट घेणारी झुलन ही जगातील एकमेव खेळाडू आहे.

Kiran Mahanavar

Jhulan Goswami : भारतीय महिला संघ आज इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे. टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर क्लीन स्वीप करून झुलनला संस्मरणीय निरोप देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरले.

क्रिकेटच्या मक्का लॉर्डमध्ये किमान एक सामना खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण कारकिर्दीतील शेवटचा सामना येथे खेळणे प्रत्येकाच्या नशिबी नसते. झूलन गोस्वामीसोबत जवळपास 20 वर्षे खेळणारी मिताली राज मैदानातून निवृत्तही होऊ शकली नाही. त्याचवेळी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि ग्लेन मॅकग्रा या महान पुरुष क्रिकेटपटूंनाही लॉर्ड्सवर कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. नियती म्हणा किंवा योगायोग झुलन तिचा शेवटचा सामना लॉर्ड्सवर खेळत आहे.

झुलनचा पहिला आणि अंतिम सामना इंग्लंडविरुद्धच

झुलनने भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना 6 जानेवारी 2002 रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता. ती इंग्लंडविरुद्ध खेळून अलविदाही करत आहे.

  • भारतासाठी झुलन 2 आयसीसी एकदिवसीय विश्वचषक फायनल (2005-2017) खेळली आहे.

  • झुलनने 353 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये 253, कसोटीत 44 आणि टी-20 मध्ये 56.

  • 200 किंवा त्याहून अधिक वनडे विकेट घेणारी झुलन (253) ही जगातील एकमेव खेळाडू आहे.

  • झुलनने 284 आंतरराष्ट्रीय सामने (204 * एकदिवसीय, 12 कसोटी, 68 टी-20) खेळले आहेत.

  • झूलनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आणि 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या अशी एकमेव खेळाडू आहे.

  • एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून 32 धावांत सहा विकेट ही झुलनची जुलै 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्धची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.

  • झुलनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9945 चेंडूत 5592 धावा दिल्या. हे दोन्ही वनडे क्रिकेटमधील विक्रम आहेत.

  • झुलनने वनडे फॉरमॅटमध्ये 68 झेल घेतले आहे, ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill: वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT