Jhulan Goswami Last Series esakal
क्रीडा

Jhulan Goswami : झुलनला विजयी निरोप देण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज

अनिरुद्ध संकपाळ

Jhulan Goswami Last Series : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. नुकतीच तीन टी 20 सामन्यांची मालिका पार पडली. मात्र इंग्लंडच्या संघात हीदर नाईटसह तीन महत्वाचे खेळाडू नसतानाही भारताचा 2 - 1 असा पराभव झाला. आता भारतीय संघ वनडे मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची ही शेवटची मालिका आहे. या मालिकेनंतर गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्यामुळे झुलनला विजयी निरोप देण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल.

वनडे मालिका जिंकण्यासाठी भारताला सर्व विभागात आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. टी 20 मालिकेत भारताची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्ही खराब झाले होते. त्यामुळे संघाला पराभव सहन करावा लागला. वनडे मालिकेत देखील इंग्लंडचे प्रमुख तीन फलंदाज नाहीयेत. त्यामुळे भारतीय संघाकडून वनडे मालिकेत विजयाची अपेक्षा केली जात आहे.

भारतीय संघातील मधली फळी कर्णधार हरमनप्रीत कौरवर अवलंबून आहे. तिच्याशिवाय इतर कोणत्याही मधल्या फळीतील फलंदाजाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. या मालिकेसाठी हेमलताला संधी देण्यात आली मात्र तिलाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. जेमिमा रॉड्रिग्सच्या फिटनेसचा प्रश्न उपस्थित झाला आहे. द हंड्रेड स्पर्धेत ती दुखापतग्रस्त झाल्यामुळे पूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला. वनडे मालिकेत देखील ती खेळेल याबाबत साशंकता आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ :

हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, सबबिनेनी मेघना, दिप्ती शर्मा, तानिया भाटिया, यस्तिका भाटिया, पूजा वस्त्रकार, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, राजेश्वरी गायकवाड, हलरीन देओल, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, जेमिमा रॉड्रिग्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT