IND vs ENG Joe Root  esakal
क्रीडा

IND vs ENG Joe Root : अक्षरला चौकार मारत रूटने मोडला सचिनचा विक्रम मात्र जडेजाने...

Root broke Sachin's record by hitting Akshar for four: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये आता जो रूटचा दबदबा...

अनिरुद्ध संकपाळ

Joe Root Test Record Sachin Tendulkar : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडची अवस्था बिकट झाली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ दुसरे सत्र सुरू होताच माघारी परतला.

इंग्लंडचा सर्वात भरवशाचा फलंदाज जो रूटने जॉनी बेअरस्टोसोबत चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर आणि जडेजाने दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, जो रूटने आपल्या 29 धावांच्या खेळीत एक विक्रम देखील केला.

इंग्लंडच्या माजी कर्णधार जो रूटने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मागे टाकला. जो रूटने आपल्या इंनिंगमधील 10 रन घेत हा कारनामा केला. सचिन तेंडुलकरने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याने 2535 धावा केल्या होत्या. आता जो रूटने हा विक्रम मागे टाकला.

आता कसोटीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर झाला आहे. जो रूटने अक्षर पटेलला चौकार मारत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच भारतीय फिरकीपटूंनी दमदार गोलंदाजी करत पाहुण्या इंग्लंडला चांगलाचे दमवले. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी पहिल्या 10 षटकात जवळपास 5 च्या सरासरीने धावा केल्या. मात्र भारतीय फिरकीपटूंनी गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर चित्र पालटले.

अश्विनने बेन डकेटला 35 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला ओली पोप हा रविंद्र जडेजाची शिकार झाला. पोप 1 धावेवर बाद झाल्यानंंतर अश्विनने पुन्हा एकदा सेट फलंदाजाची शिकार केली. त्याने झॅक क्राऊलीला 20 धावांवर बाद केले.

इंग्लंडची अवस्था 3 बाद 60 धावा अशी झाल्यानंतर अनुभवी जॉनी बेअरस्टो आणि जो रूटने चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. या जोडीची भागीदारी 60 धावांच्या पार गेल्यानंतर अक्षर पटेलने कमाल केली. 35 धावा करणाऱ्या बेअरस्टोचा त्रिफळा उडवत इंग्लंडला चौथा धक्का दिला. पाठोपाठ रविंद्र जडेजाने देखील रूटला 29 धावांवर बाद केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

INDW vs PAKW: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतरही हरमनप्रीत कौर नाराज! म्हणाली, आता मायदेशात गेल्यानंतर...

RSS History: अभ्यासक्रमात आता 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास'; 'या' विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Natural Collagen Boosters: सप्लीमेंट्स विसरा! 'या' 5 नैसर्गिक पदार्थांनी वाढवा कोलेजन, त्वचारोगतज्ज्ञांनी शेअर केला खास Video

SCROLL FOR NEXT