Virat Kohli Jonny Bairstow Ashes Series  2023
Virat Kohli Jonny Bairstow Ashes Series 2023 esakal
क्रीडा

Virat Kohli Jonny Bairstow : बेअरस्टोची आता सटकली! रूट म्हणतो, ऑस्ट्रेलियाने विराटसारखी चूक केली आता...

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Jonny Bairstow Ashes Series 2023 : अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत जॉनी बेअरस्टोला एलेक्स कॅरीने स्टम्प आऊट केलं होतं. यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी चागंलाच वाद घातला. मात्र तिसऱ्या पंचांनी जॉनी बेअरस्टोला बाद ठरवले. बेअरस्टो पाचव्या दिवशी मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने इंग्लंडला मोठा फटका बसला होता. यानंतर बेअरस्टोच्या बाद होण्यावरून अनेक गोष्टी बोलल्या, लिहिल्या गेल्या.

आता इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने ऑस्ट्रेलियाच्या संघाला इशारा दिला आहे. रूटच्या मते ऑस्ट्रेलियाने विराट कोहली सारखी चूक केली आहे. आता बेअरस्टो तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देणार असेही रूट म्हणतोय.

भारत आणि इंग्लंड याच्यातील 2021 मधील कसोटी मालिका स्थगित झाली होती. त्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 2022 मध्ये खेळवला गेला. एजबेस्टन कसोटीत विराट कोहलीने बेअरस्टोला स्लेजिंग केले होते. त्यानंतर बेअरस्टोने याचे उत्तर बॅटने देत दमदार खेळी करत शतक ठकोले. या शतकामुळे भारताचा पराभव झाला अन् पाच सामन्यांची मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सुटली.

रूट या घटनेची आठवण करून देत म्हणाला की, 'मला नाही वाटत बेअरस्टोला आवडलं असेल. मला नाही वाटत हे कोणालाही आडवलेलं आहे. मात्र बेअरस्टो अशा घटनांनंतर चांगली कामगिरी करतो. तुम्ही त्याचा मूड लगेच ओळखू शकता.'

बेअरस्टो भारताविरूद्धच्या एजबेस्टन कसोटीचे उदारण देत म्हणाला, 'गेल्या वर्षीची एजबेस्टन कसोटी आठवा. कोणीतरी त्या दिवशी काही म्हणाले मला वाटते की विराटच काहीतरी बोलला होता. त्यानंतर बेअरस्टोने दमदार कामगिरी करत. मला आशा आहे की असं परत एखदा होईल.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : भाजपाने गाठला बहुमताचा आकडा.... राहुल गांधींचे हृदयाचे वाढले ठोके; जाणून घ्या तासाभराचे कल

Maharashtra Lok Sabha Election Results Live : रायगडमधून सुनील तटकरे, तर साताऱ्यातून शशिकांत शिंदे आघाडीवर

Lok sabha Election 2024 : EVM मशिनमध्ये कोणतीही छेडछाड तर झाली नाही ना? हे मतमोजणीपूर्वी कसे तपासले जाते? घ्या जाणून

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेकडून श्रीलंकेचा धुव्वा ; ॲनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडाची प्रभावी गोलंदाजी

Lok Sabha Election 2024: लोकसभेत विरोधी पक्ष कसा निवडला जातो अन् विरोधी पक्ष नेत्याला कोणते लाभ मिळतात? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT