Josh Hazlewood esakal
क्रीडा

Ashes | अ‍ॅडलेड कसोटीपूर्वी ऑस्टेलियाला मोठा धक्का; हेजलवूड आऊट

अनिरुद्ध संकपाळ

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Test ) पहिली गाबा कसोटी (Gabba Test) जिंकून मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. दुसरी कसोटी अ‍ॅडलेड (Adelaide) येथे होणार असून ही कसोटी दिवस रात्र कसोटी (Day Night Test) असणार आहे. मात्र या कसोटीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला (Australia) मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अव्वल गोलंजा जॉश हेजलवूड (Josh Hazlewood) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो अॅडलेड कसोटीला मुकणार आहे.

गुरुवापासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीसाठी (2nd Ashes Test) ऑस्ट्रेलिया संघ सज्ज होत आहे. त्यांनी गाबा कसोटी (Gabba Test) ९ विकेट्स राखून जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता. आता अ‍ॅडलेडवरील गुलाबी चेंडूवरील (Pnik Ball Cricket) कसोटी जिंकून अ‍ॅशेस मालिकेतील आघाडी वाढवण्याच्या मनसुब्यात ऑस्ट्रेलिया होती. मात्र त्यांना सामन्यापूर्वीच एक धक्का बसला. जॉश हेजवलूड (Josh Hazlewood) हा गाबा कसोटीतच जायबंदी झाला होता. आता तो अ‍ॅडलेड कसोटी खेळू शकणार नाही याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड कसोटीसाठी आज आपल्या १४ सदसीय संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड कसोटीसाठी (Adelaide Test) आपल्या संघात वेगवान गोलंदाज मायकेल नेसेर (Michael Neser) आणि जे रिचर्डसनचा (Jhye Richardson) समावेश केला आहे. तर लेग स्पिनर मिशेल स्वेपसन (Mitchell Swepson) याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

निवडसमिती आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मेलबर्न आणि सिडनी कसोटीसाठीच्या संघाची घोषणा हीअ‍ॅडलेड कसोटीनंतर करण्यात येणार असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT