Ashes Series David Warner  esakal
क्रीडा

Ashes Series David Warner : खतरनाक स्विंग! टाँगच्या स्विंगने कांगारूंचा लंच झाला कडू, Video व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Ashes Series David Warner : अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून लॉर्ड्सवर सुरू झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या सुरूवातीलाच आंदोलकांनी खेळपट्टीवर येण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला.

त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात करून दिली. मात्र इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जॉश टाँगने दोन्ही सलामीवीरांचा त्रिफळा उडवत कांगारूंना मोठा धक्का दिला. जॉशने डेव्हिड वॉर्नरची घेतलेली विकेट विशेष चर्चेत राहिली.

उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 73 धावांची भागीदारी रचत दमदार सुरूवात केली. ही सलामी जोडी पहिल्या सत्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवणार असे वाटत असतानाच टाँगने उस्मान ख्वाजाला 17 धावांवर बाद केले. त्यानंतर 88 चेंडूत 66 धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा देखील त्रिफळा उडवत उपहारापूर्वी कांगारूंना मोठा धक्का दिला.

ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी ढगाळ वातावरणात इंग्लिश गोलंदाजांचा नेटाने सामना करण्यास सुरूवात केली होती. त्यातच या आंदोलकांना गोंधळ घातला. तरीही डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिला 10 षटके चांगली खेळत सुरूवात चांगली करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आक्रमक डेव्हिड वॉर्नरने 66 चेंडूत अर्धशतक ठोकले. दुसऱ्या बाजूला ख्वाजा सावध खेळत होता. या दोघांनी 73 धावांची सलामी दिली. मात्र जॉश टाँगने ख्वाजाचा त्रिफळा उडवला. ख्वाजा बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाला शंभरीच्या जवळ पोहचवले होते.

मात्र उपहारानंतर जॉशने वॉर्नरचा 66 धावांवर त्रिफळा उडवला. जॉशचा चेंडू इतक्या वेगाने आत आला की वॉर्नरला काही कळण्याच्या आता त्याची दांडी गुल झाली होती. वॉर्नरही टाँगच्या स्विंगने अवाक झाला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT