ज्युनियर आशियाई हॉकी करंडका sakal
क्रीडा

Junior Women Hockey : भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाला बरोबरीत रोखले

भारतीय संघाने सात गुणांसह सरस गोलफरकाच्या जोरावर ज्युनियर आशियाई हॉकी करंडका

सकाळ वृत्तसेवा

काकामिगहारा (जपान) : भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाला बरोबरीत रोखले. दक्षिण कोरियाने पहिल्या ३० मिनिटांमध्ये गोल करीत आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताच्या दीपिका सोरेंग व दीपिका यांनी शानदार गोल करीत भारतीय संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली.

भारतीय संघाने सात गुणांसह सरस गोलफरकाच्या जोरावर ज्युनियर आशियाई हॉकी करंडकाच्या अ गटातील गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. दक्षिण कोरियानेही ७ गुणांचीच कमाई केली असून त्यांचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

भारत-दक्षिण कोरिया यांच्यामधील लढतीच्या पहिल्या क्वॉटरमध्ये कोरियाच्या खेळाडूंचेच वर्चस्व दिसून आले. दोन पेनल्टी कॉर्नरही त्यांना मिळाले, पण यावर गोल करण्यात त्यांना अपयश आले. अखेर १५ व्या मिनिटाला युजीन ली हिने ‘डी’ विभागाच्या आतमधून फिल्ड गोल करून दक्षिण कोरियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या क्वॉटरमध्ये सुरुवातीला कोरियाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. पण भारतीय खेळाडूंनी तोडीसतोड आक्रमण करीत दक्षिण कोरियावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. दक्षिण कोरियाने मात्र भारतावरील आक्रमण कायम ठेवले. जियोन चोई हिने ३० व्या मिनिटाला गोल करीत दक्षिण कोरियासाठी दुसरा गोल केला. दुसऱ्या क्वॉटरनंतर दक्षिण कोरियाकडे २-० अशी आघाडी झाली.

शानदार गोलांनी बरोबरी

पहिल्या दोन क्वॉटरमध्येकोरियाने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाने पुढील दोन क्वॉटरमध्ये पुनरागमन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

Pimpalgaon Rescue: पिंपळगाव-खडकीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने थरारक सुटका

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

SCROLL FOR NEXT