Jyoti Yaraji Sakal
क्रीडा

Jyoti Yaraji: आता अपेक्षा ज्योती यराजी हिच्याकडून; जागतिक ॲथलेटिक्स - प्राथमिक फेरीतच कडवे आव्हान असणार

चीनमधील स्पर्धेत तिने १२.७८ सेकंद अशी विक्रमी वेळ दिली.

सकाळ डिजिटल टीम

बुडापेस्ट - जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतीयांचे आशास्थान असलेल्या खेळाडूंपैकी एक ज्योती यराजी आपल्या आवडत्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीत उद्या, मंगळवारी प्राथमिक फेरीत सहभागी होत आहे. अविनाश साबळे, तिहेरी उडीतील प्रवीण चित्रावेल, अब्दुला अबुबकर यांनी निराशा केल्यानंतर ज्योतीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत.

गेल्या महिन्यात आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने चीनमध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. चीनमधील स्पर्धेत तिने १२.७८ सेकंद अशी विक्रमी वेळ दिली. यंदा तिच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय पदके, १२.७८ सेकंद अशी वेळ असली, तरी उद्या प्राथमिक फेरीतच तिच्यापुढे तगडे आव्हान आहे.

१०० मीटर हर्डल्स शर्यतीत ४० खेळाडूंची पाच हीटमध्ये विभागणी करण्यात आली असून ज्योतीचा चौथ्या हिटमध्ये समावेश आहे. प्रत्येक हिटमधील प्रथम चार आणि उर्वरित खेळाडूंमधून चार सर्वोत्कृष्ट वेळेची नोंद करणारे खेळाडू उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेती व गत स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती प्युर्टो रिकोची जस्मिन कमाचो क्वीन ही ज्योतीच्याच हिटमध्ये आहे. जस्मिनची यंदाची सर्वोत्तम वेळ १२.३१ सेकंद अशी आहे.

याशिवाय स्वित्झर्लंडची युरोपियन ब्राँझपदक विजेती २१ वर्षीय दिताजी कम्बुदजी, टोकियोत पाचवे स्थान मिळवणारी नेदरलँडची नदिन व्हिसेर आणि फ्रान्सची इनडोअर राष्ट्रीय विजेती लिशिया बाप्टे या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.दिताजीची यंदाची सर्वोत्तम वेळ १२.४७, नदिनची १२.६५; तर लिशियाची १२.६९ सेकंद अशी आहे.

यावरून ज्योतीपुढे किती कडवे आव्हान आहे हे स्पष्ट होते. ज्योतीने १२.७८ सेकंद या आपल्या सर्वोत्तम वेळेपेक्षा सरस कामगिरी केली तर ती पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरेल. कारण पॅरिससाठी १२.७७ सेकंद अशी पात्रता आहे. याशिवाय क्रिशन कुमार ८०० मीटरच्या प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Politics: ट्रम्पमुळे कोपरगाव रस्ता रखडला: सुजय विखे पाटील; अजब दाव्याने राजकीय चर्चा

IND vs SL 1st Test: रिषभ पंतला संघातून हाकलण्याची वेळ आलीय! फॅन्सची मागणी; माजी क्रिकेटपटूने त्याचा 'common sense' काढला...

Mumbai Goa Highway Toll : ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू; मासिक 350 रुपयांचा पास की 50 टक्के सूट? जाणून घ्या वाहननिहाय टोलचे संपूर्ण दर

Marathi News Live Updates : कांदिवलीत चार मजली व्यावसायिक इमारतीला आग; ११ जणांची सुखरूप सुटका

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT