sakal (8).jpg 
क्रीडा

AUSvsIND : टेस्ट मालिकेत न खेळताच लोकेश राहुल 'आउट'

सकाळ ऑनलाईन टीम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरुवार पासून सिडनीच्या मैदानावर खेळण्यात येणार आहे. तर मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघावर आठ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाशी 1 - 1 अशी बरोबरी साधली आहे. मात्र तिसरा सामना सुरु होण्याअगोदरच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय संघाचा विकेटकिपर फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना सिडनीच्या एमसीजी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी नेट मध्ये सराव करताना फुल फॉर्म मध्ये असलेल्या केएल राहुलला दुखापत झाली असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली आहे. नेट मध्ये फलंदाजी करताना केएल राहुलच्या उजव्या हाताला दुखापत झाली असल्यामुळे तो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला असल्याचे बीसीसीआयने आज सांगितले. तसेच तो आगामी दोन सामने पार पडण्यापूर्वीच भारतात परतणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.  

केएल राहुल यापूर्वीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेयिंग इलेव्हनचा भाग नव्हता. मात्र आगामी दोन सामन्यांमध्ये त्याला मैदानावर उतरण्याची संधी मिळण्याअगोदरच दुखापतीमुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा मोठा झटका असणार आहे. कारण सामन्याच्या वेळेस कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास टीम इंडियाकडे आता कमी पर्यायी खेळाडू असणार आहेत. 

दरम्यान, ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेमध्ये केएल राहुलने चांगली खेळी केली होती. तर आता तो आगामी दोन सामन्यांच्या वेळेस भारतीय संघासोबत नसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला डे नाईट सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. यानंतर दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. आणि आता तिसरा सामना येत्या गुरुवारपासून खेळवण्यात येणार आहे. व शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT