Kagiso Rabada Viral Video 
क्रीडा

Kagiso Rabada Viral Video : रबाडाची हिंदी ऐकून भावी सासरेबुवांना आली असेल चक्कर

रबाडा गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी देत आहे टिप्स.

Kiran Mahanavar

Kagiso Rabada Viral Video : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा स्टार वेगवान कागिसो रबाडा त्याच्या किलर बॉलिंगसाठी ओळखला जातो. रबाडा आयपीएल मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला होता. परदेशी खेळाडू जेव्हा आयपीएलमध्ये खेळतात तेव्हा ते भारतीय खेळाडूंशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. पण आता दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज रबाडा हिंदी बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कागिसो रबाडाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तो हिंदीत बोलताना दिसत आहे. कागिसो रबाडा भारतीय रेडिओ जॉकी करिश्मासोबत हिंदीत बोलताना दिसला. रबाडा आपल्या गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी टिप्स देताना दिसतो. पण यादरम्यान तो अशा चुका करतो की ऐकल्यानंतर तुम्हाला हसू आवरत नाही.

कागिसो रबाडा हा त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही फलंदाजीच्या आक्रमणाला फाटा देऊ शकतो. डावाच्या सुरुवातीला तो खूपच धोकादायक असल्याचे सिद्ध होते. रबाडा दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 55 कसोटी सामन्यात 257 विकेट्स, 87 एकदिवसीय सामन्यात 135 बळी आणि 49 टी-20 सामन्यात 55 बळी घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आंदोलक विद्यार्थ्यांशी वागताना संयम आणि सावधगिरी बाळगायला हवी, सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी

Jalna District Bank: जालना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी राहुल लोणीकर; व्हाईस चेअरमनपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड

Career Guide: नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे? जाणून घ्या कोर्सेस, पात्रता, NEET आणि प्रवेश प्रक्रिया!

Taloda Bribery Case: शेतीचा ३२ एम नमुना प्रमाणपत्रासाठी मागितली लाच, ५ हजार घेताना अव्वल कारकून जाळ्यात, याआधीही लाचखोरीचा गुन्हा

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT