Kiran Magar Sakal
क्रीडा

Kiran Magar : कळंबचा युवा खेळाडू करणार राज्याच्या कबड्डीच्या संघाचे नेतृत्व

गोव्यामध्ये उद्या शनिवार (ता. ४) पासुन ८ नोव्हेंबर पर्यंत ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राजकुमार थोरात

वालचंदनगर - कळंब (ता. इंदापूर) येथील किरण मगर या कबड्डीपट्टू खेळाडूची महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाच्या कर्णधार पदी निवड झाली असून कळंबचा युवा खेळाडू महाराष्ट्र राज्याच्या कबड्डीच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

गोव्यामध्ये उद्या शनिवार (ता. ४) पासुन ८ नोव्हेंबर पर्यंत ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्राचा संघ निवडला असून १२ खेळाडूंचा समावेश आहे. किरण मगर याची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून, महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

किरण मगर याचे मूळ गाव सोलापूर जिल्हातील मगराचे निमगाव आहे. तो लहानपणापासुन कळंब मध्ये अनिल घाडगे या मामाकडे राहत आहे. किरणचे शिक्षण वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयात झाले आहे. त्याला सुरवातीपासुन कबड्डीच्या खेळाची आवड आहे. कळंबमधील राणाप्रताप कबड्डीच्या संघातून त्याने अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पाताळीवरील सामन्यामध्ये विजय मिळवून दिला आहे.

गोव्यामध्ये होणाऱ्या कबड्डीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या संघाला यश देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. किरणच्या कर्णधार पदाच्या निवडीमुळे कळंब गावातील नागरिकांनी आनंद झाला असुन त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.

प्रो-कबड्डीसाठी यूपी योद्धाच्या संघात निवड

भारतीय ऑलम्पिक असोसिएनशन माध्यमातुन २ डिसेंबरपासुन प्रो-कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून या युपी योद्धा या संघामध्ये किरण मगर याची निवड झाली असून १३ लाख रुपयांची बोली लावून किरण मगर याला संघात घेण्यात आले आहे. किरण मगर याची २०२२ मध्ये झालेल्या प्रो-कबड्डीमध्ये यु-मुंबा संघामध्ये ३१ लाख रुपयांची बोली लावून निवड झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT