kalyan chaubey Sakal
क्रीडा

AIFF : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबेंची निवड

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बाईचुंग भुतिया हेदेखील अध्यक्ष पदाच्या शर्यतील होते

सकाळ डिजिटल टीम

Kalyan Chaubey Elected As New President Of AIFF : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे यांची शुक्रवारी निवड झाली आहे. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बाईचुंग भुतिया हेदेखील अध्यक्ष पदाच्या शर्यतील होते मात्र, चौबे यांनी या पदावर बाजी मारत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मान मिळवला आहे. या निवडणुकीत भुतियाला केवळ एक मत मिळाले, तर चौबे यांना 33 मते मिळाली. या विजयामुळे चौबे एआयएफएफचे पहिले असे अध्यक्ष बनले आहे जे माजी खेळाडू आहेत.

या निवडणुकीत एकूण 34 राज्यांनी भाग घेतला होता, त्यापैकी भुतिया यांना केवळ एका राज्याचे मत मिळाले. एआयएफएफची कमान माजी फुटबॉलपटूच्या हाती येण्याची ही पहिलीच वेळ असून यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. 45 वर्षीय कल्याण चौबे यांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. ते पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. गुजरात आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे ते या पदासाठी आधीच विजयाचे दावेदार मानले जात होते.

कोण आहेत कल्याण चौबे

कल्याण चौबे हे भारतीय फुटबॉल संघाचे माजी गोलकीपर आहे. 2019 मध्ये त्यांनी कृष्णानगरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. कल्याण चौबे 1997-98 आणि 2001-02 मध्ये भारतीय गोलकीपर ऑफ द इयर म्हणून निवडले गेले आहेत. चौबे हे कोलकाता जायंट्स मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या दोन्ही संघांसाठीदेखील खेळले आहेत. याशिवाय त्यांनी गोव्याच्या साळगावकर संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT