Kamurli Cricket Ground
Kamurli Cricket Ground esakal
क्रीडा

Cricket : क्रिकेट खेळताना दुसरी धाव ठरली अखेरची..; कामुर्लीत तरुणाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

तरुणपणात हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना मागच्या काही वर्षात वाढल्या आहेत.

म्हापसा (Mapusa) : तरुणपणात हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना मागच्या काही वर्षात वाढल्या आहेत. कामुर्लीतील (Kamurli Cricket Ground) मैदानावर क्रिकेट खेळताना पांडुरंग विठू खोर्जुवेकर (३९, रा. मळेवाडा-कामुर्ली) या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) मृत्यू झाला.

पांडुरंग मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. तो फलंदाजी करत होता. दुसरी धाव काढतानाच काळानं त्याच्यावर घाला घातला. पांडुरंग हा दुसरी धाव काढत असताना धावपट्टीवरच कोसळला. या प्रकारानंतर त्याला मित्राच्या इनोव्हा कारनं (Innova Car) तीनमाड-सडये येथील रुग्णालयात आणण्यात आलं. पण, तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलं.

सोमवारी गोमेकॉमध्ये उत्तरीय तपासणी केली असता, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं स्पष्ट झालं. पांडुरंगला रक्तदाब व मधुमेहाचा विकार जडला होता. तो पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. कोलवाळ पोलीस (Kolwal Police) उपनिरीक्षक कुणाल नाईक यांनी पंचनामा केला. ही घटना रविवारी घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT