Kane Williamson fractures left thumb 
क्रीडा

World Cup 2023 : संघाच्या अडचणीत वाढ! कर्णधारचा अंगठा झाला फ्रॅक्चर, वर्ल्ड कपमधून जाणार बाहेर?

Kiran Mahanavar

Kane Williamson fractures left thumb : 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. पण 18 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या चौथ्या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. नुकताच दुखापतीतून परतलेला कर्णधार केन विल्यमसन पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. आता तो जवळपास महिनाभर संघाबाहेर आहे.

बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी 2023 च्या वर्ल्ड कपमधील विल्यमसनचा पहिला सामना होता. त्या सामन्यात त्याने 107 चेंडूत 78 धावांची खेळी खेळली होती. पण त्या सामन्यात विल्यमसनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

न्यूझीलंड क्रिकेटने शनिवारी याची पुष्टी करत पोस्टमध्ये लिहिली की, एक्स-रेने केन विल्यमसनच्या डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये फ्रॅक्चर झाल्याची पुष्टी केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पूल लेग सामन्यांच्या अंतिम फेरीसाठी उपलब्ध राहण्याच्या उद्देशाने तो वर्ल्डकप संघात कायम राहील.

प्रशिक्षक गॅरी स्टेड यांना आशा आहे की विल्यमसन तंदुरुस्त होईल आणि राऊंड रॉबिन टप्प्यातील शेवटचे काही सामने खेळेल. न्यूझीलंडचा पुढचा सामना बुधवारी चेन्नईत अफगाणिस्तानशी होणार आहे.

या वर्षी मार्चमध्ये आयपीएलदरम्यान विल्यमसनलाही दुखापत झाली होती. गुजरात टायटन्सकडून खेळताना विल्यमसनचा खांदा मोडला होता. यानंतर त्याला सावरायला आठ महिने लागले. या वर्ल्ड कपमध्ये त्याने पुनरागमन केले आणि आता त्याला पुन्हा दुखापत झाली आहे. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा नऊ गडी राखून, दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा 99 धावांनी तर तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा आठ विकेट राखून पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT