Kapil Dev Dance Viral Video 
क्रीडा

Kapil Dev Dance : 'गुलाबी आँखे जो तेरी देखी...' कपिल देव यांचा पत्नी रोमीसोबत 'रोमँटिक' डान्स

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव हे नेहमीच त्यांच्या हटके स्टाईल आणि वक्तव्यासाठी ओळखले जातात.

युगंधर ताजणे

Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव हे नेहमीच त्यांच्या हटके स्टाईल आणि वक्तव्यासाठी ओळखले जातात. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघात महत्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या कपिल देव यांचा पत्नी रोमीसोबतचा तो व्हिडिओ चर्चेत आला आहे.

कपिल देव हे जसे त्यांच्या भेदक गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात तसेच ते त्यांच्या दिलखुलास अंदाजासाठीही परिचित आहेत. सोशल मीडियावर कपिल देव यांचा पत्नी रोमीसोबत गुलाबी ऑखे जो तेरी देखी....या गाण्यावरील डान्स चाहत्यांची दाद मिळवून गेला आहे. नेटकऱ्यांनी तो डान्स पाहिल्यावर दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कामगिरीनं अचाट पराक्रम करणाऱ्या कपिल यांचा तो अंदाज चाहत्यांना अवाक् करुन गेला आहे.

सोशल मीडियावरील त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना जिंकून घेतले आहे. एकानं तर कपिल देव यांच्या डान्सची तुलना बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांशी केली आहे. कपिलजी तुमचा हा अंदाज आम्हाला माहिती नव्हता. मोठ्या उत्साहानं आणि तितक्याच उर्जेनं तुम्ही डान्स केला जो आम्हाला खूपच आवडला. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कपिल देव यांचं कौतुक केलं आहे.

निमित्तं होतं कपिल देव यांच्या ६५ व्या जन्मदिनाचे. सहा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात त्यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. या दिवशी देशभरातून त्यांच्या लाखो चाहत्यांनी कपिल देव यांना शुभेच्छा दिल्या. यानिमित्तानं वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. कपिल यांचा तो गुलाबी अंदाज पाहून नेटकऱ्यांनाही भुरळ पडली आहे. ज्या गोलंदाजानं आपल्या हुकमी गोलंदाजीनं जगभरातील फलंदाजांना नाचवलं त्याला अशा वेगळ्या अंदाजात पाहताना चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं १९८३ मध्ये विश्वकरंडकावर नाव कोरले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा जगभर दबदबा तयार झाला होता. यानंतर कपिल देव यांनी प्रसिद्ध समालोचक म्हणून देखील आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. १९७८ मध्ये कपिल देव यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध झालेल्या सामन्यातून डेब्यू केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT