Kapil Dev has been invited as the guest of honor In Indian Film Festival Melbourne esakal
क्रीडा

IFFM 2022 : कपिल देव असणार इंडियन फिल्म फेस्टिव्हलचे प्रमुख पाहुणे

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचे दिग्गज माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना मेलबर्नमध्ये (Melbourne) होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Indian Film Festival 2022) प्रमुख पाहुणे होण्याचा सन्मान मिळणार आहे. ते कबीर खान (Kabir Khan) यांनी दिग्दर्शित केलेल्या 83 चित्रपटाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारताला पहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघाची कहाणी लोकांसमोर मांडण्यात आली आहे.

दरम्यान, इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण मिळाल्यानंतर कपिल देव म्हणाले की, 'मी IFFM 2022 मध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय चित्रपटाचा सोहळा साजरा करण्यासाठी ते एक उत्तम व्यासपीठ आहे. मला खरंच असं वाटतं की खेळ आणि चित्रपट हे दोन मुख्य सांस्कृतिक अनुभव देणारी क्षेत्रं आहेत. फक्त देशाला नाही तर संपूर्ण जगातील समुदायांना या दोन गोष्टी एकत्र बांधून ठेवतात. अनेक दशकांपासून या गोष्टी लोकांना एकत्र करत आहेत. आपल्या मनात खेळ आणि चित्रपटांसाठी खोलवर भावनिक नातं तयार झालं आहे. ज्यावेळी ही दोन क्षेत्रे एकत्र आलीत तर तो प्रत्येकासाठी गौरवशाली अनुभव असतो.'

IFFM 2022 हे 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान व्हिक्टोरियन कॅपिटलमध्ये संपन्न होणार आहे. जगभर कोरोनाच्या महामारीचा उद्रेक झाला 2019 ला या फेस्टिव्हलचे व्हर्चुअल सादरीकरण शाहरूख खान, अर्जुन कपूर, तब्बू, विजय सेतूपती, रिमा दास, झोया अख्तर, करण जोहर यासारख्या अनेक कलाकारांनी केले होते.

मात्र यंदा हा फिल्म फेस्टिव्हल प्रत्यक्षात होणार आहे. या फेस्टिव्हलचे दिग्दर्शक मितू भोवमिक म्हणाले की, 'भारतीय फिल्म फेस्टिव्हल आता पुन्हा प्रत्यक्षात होणार आहे याचा आनंद आहे. जरी हा सोहळा प्रत्यक्षात होत असला तरी काही व्हर्चुअल कार्यक्रम देखील असणार आहेत. आमच्या सोबत दिग्गज क्रिकेटर कपिल देव देखील असणार आहेत. आम्ही त्यांची मेलबर्नमध्ये स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. हा फिल्म फेस्टिव्हल क्रिकेट आणि चित्रपट चाहत्यांच्या शहरात होणार आहे. त्यामुळे याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. या फेस्टिव्हलमध्ये भारतीय उपखंडातील 100 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. याद्वारे भारतीय चित्रपट सृष्टीचे वैभव आणि वैविध्यतेचे प्रदर्शन होणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT