PRAVIN TAMBE Sakal
क्रीडा

Kaun Pravin Tambe : ये तो सिर्फ ट्रेलर है...पिक्चर अभी बाकी

श्रेयस तळपदे साकारताना दिसणार क्रिकेटर प्रविण तांबेची भुमिका

सकाळ वृत्तसेवा

KAUN PRAVIN TAMBE TRAILER: माजी क्रिकेटर प्रविण तांबे याच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या पूर्वीही अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर सिनेमे बनवले गेले आहेत. महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, कपिल देव यांच्या सोबत आता प्रविण तांबेचा ही बायोपिक येणार आहे. क्रिकेटर प्रविण तांबे यांचा संघर्षमय प्रवास या सिनेमाच्या माध्यमातुन लवकरच प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रविणच्या मुख्य भुमिकेत श्रेयस तळपदे असणार आहे. 'कोन प्रविण तांबे' असे चित्रपटाचे नाव असणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या प्रस्तावनेने आहे. यात श्रेयसचा नविन लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात प्रविणच्या क्रिकेट आणि वैयकेतीक आयुष्याविषयी सांगितले जाणार आहे. 2 मिनिटे 51 सेकंदाचा ट्रेलर आहे. सुरूवातीलाच श्रेयस तळपदे गोलंदाजी करताना दिसत आहे. यात प्रविणचा संघर्ष दाखवला आहे. या सिनेमात वैयक्तिक आयुष्य, नोकरी, टोमणे, लग्न आणि नंतर पत्नीसोबत होणारे वाद या सर्व गोष्टी उलगडणार आहेत.

नोकरी करत क्रिकेट खेळण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले यांचा सपूर्ण प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 1 एप्रिलला ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलिज होणार आहे. डिस्नी प्लस हॉस्टारवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

प्रविण तांबे यांचा जन्म 1971 चा आहे. वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्स संघातून आयपीएलमध्ये प्रदार्पण केले होते. गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या संघात खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Train : भारत-नेपाळ संबंध आणखी दृढ ! अयोध्या ते जनकपूर धाम थेट रेल्वे सेवा सुरू होणार; ६०४ किमीचा प्रवास १९ तासांत

Karmad Accident: रेतीच्या भरधाव हायवाची दुचाकीला धडक; दोन चुलत भावांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ढिंग टांग : क्यू आर...क्यूं यार..?

Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर साखर कारखान्याची पहिली उचल ३६०० रुपये प्रतिमेट्रिक टन; २०२६-२७ गाळप हंगामासाठी दर जाहीर

COVID Variant : कोरोनाचा नवा धोका? १८ देशांत पसरलेल्या PJ.2.1 व्हेरिएंटबाबत WHO चे मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT