

India Nepal Rail Connectivity: What Passengers Need to Know
esakal
Janakpur Dham Ayodhya Cantt Express: Route and Key Details : भारत आणि नेपाळमधील धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणारी महत्त्वाची रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार आहे. भगवान श्रीरामांचे जन्मस्थान अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थान मानले जाणारे जनकपूर धाम ही दोन पवित्र धार्मिक स्थळे आता थेट रेल्वेने जोडली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र 'बालेन' शाह २३ नोव्हेंबर रोजी या रेल्वे सेवेचे व्हर्च्युअल माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. 'जनकपूर धाम-अयोध्या कॅन्ट एक्सप्रेस' असे या गाडीचे नाव असून, ती १५५९५ आणि १५५९६ या क्रमांकांनी धावणार आहे.