बॉक्सर कविंदरने झंझावात कायम राखला
बॉक्सर कविंदरने झंझावात कायम राखला 
क्रीडा

कविंदर, मनीषचे विजयी ठोसे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आशियाई उपविजेत्या कविंदर बिश्‍तने जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेतील भारतीयांचे विजयी ठोसे कायम राखताना 57 किलो गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, मनीष कौशिकनेही (63 किलो) गटात आगेकूच केली आहे.

पाचव्या मानांकित कविंदरने चीनच्या झेन झिहाओ याचा 3-2 असा पाडाव केला. कमालीच्या चुरशीच्या लढतीत कविंदर वेग आणि दमछाकमध्ये सरस ठरला. त्याने मोक्‍याच्या वेळी ठोसे देत आपल्या बाजूने 30-27, 29-28, 30-27, 28-29, 28-29 असा कौल देण्यास भाग पाडले. रशियात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या सातपैकी सहा बॉक्‍सरनी आगेकूच केली आहे. केवळ आशीष कुमारचे (75 किलो) आव्हान आटोपले आहे.

लढत चांगली झाली. दोन लढतीत दीर्घ ब्रेक असल्याचा कामगिरीवर काहीसा परिणाम झाला. मात्र लढतीची योजना तयार असल्यामुळे माझ्यापेक्षा ऊउंच आणि वेगवान प्रतिस्पर्ध्यास पराजित करू शकलो. आगामी प्रतिस्पर्धीही ऊउंच असल्याने या लढतीचा नक्कीच फायदा होईल, असे त्याने सांगितले.

पहिलीच जागतिक स्पर्धा खेळणाऱ्या मनीषने नेदरलॅंडस्‌च्या एनरिको लॅक्रूझ याचा 5-0 असा पाडाव केला. माजी राष्ट्रीय विजेत्या मनीषने दोन्ही हातांचा चांगला समन्वय राखला आणि प्रतिस्पर्ध्याला बचावाचीही संधी दिली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT