मॅरेथॉनचा विक्रमवीर केल्विन किप्टमचं अपघाती निधन 
क्रीडा

Kelvin Kiptum Dies: मॅरेथॉनचा विक्रमवीर केल्विन किप्टमचं अपघाती निधन; कोचनंही गमावले प्राण

पॅरिस ऑलिम्पकमध्ये नवा विक्रम नोंदवण्यावर त्यानं लक्ष्य केंद्रीत केलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जागतिक मॅरेथॉन स्पर्धेतील विक्रमवीर अन् केनयाचा स्टार अॅथलिट केल्विन किप्टम याचं वयाच्या २४ व्या वर्षी एका रस्ते अपघातात निधन झालं आहे. विशेष म्हणजे या अपघातात त्याच्या कोचचाही मृत्यू झाला. रिफ्ट व्हॅली इथं झालेल्या या भीषण अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. (Kelvin Kiptum Kenya Marathon world record holder dies in road accident at 24)

इतक्या कमी वयात जागतीक विक्रमवीर म्हणून नोंद झालेल्या किप्टमनं अशी अचानक एक्झिट घेतल्यानं क्रीडा क्षेत्रासह क्रिडाप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. किप्टम यानं शिकागो मॅरेथॉनमध्ये इतिहास घडवला होता. त्यानं 2:00:35 असा सर्वोत्तम टाइम नोंदवला होता. यापूर्वी त्याचा प्रतिस्पर्धी इलिवूड किपचोगे यानं 2:01:09 यावेळत मॅरेथॉन पूर्ण केली होती.

जगातील सात सर्वात वेगवान मॅरेथॉनपैकी तीन मॅरेथॉनमध्ये किप्टमच्या नावावर विक्रम होता. पण त्यानं आता दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याच लक्ष्य ठेवलं होतं. आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदार्पणातच विक्रम नोंदवण्यासाठी त्यानं प्रयत्न सुरु केले होते. (Latest Marathi News)

निधनावर शोक

यासंदर्भात वर्ल्ड अॅथलिटिक्स या संघटनेचे अध्यक्ष सेबेस्टिअन को आणि इतर मान्यवरांनी किप्टमच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. को यांनी ट्विट करत म्हटलं की, किप्टम हा असामान्य खेळाडू होता त्यानं आपल्यामागं मोठा वारसा सोडला आहे. या महान खेळाडूला आणि त्याच्या कोचला गमावल्याबद्दल अतिव दुःख झालं आहे. (Marathi Tajya Batmya)

जागीच मृत्यू

रविवारी संध्याकाळी अफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली इथं किप्टमच्या कारला भीषण अपघात झाला. किप्टम स्वतः काल चालवत होता, त्याच्यासोबत त्याचे कोचही होते. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या कारमध्ये असलेली तिसरी व्यक्ती शॉरोन केसगी या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT